Advertisement

मुंबईतील यशवंत नाट्य संकुलाला लवकरच मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा


मुंबईतील यशवंत नाट्य संकुलाला लवकरच मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा
SHARES

मुंबईतील अखिल भारतीय नाट्य परिषदेचे यशवंत नाट्य संकुल लवकरच नव्या रूपात दिसणार आहे. याबाबत घोषणा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. नव्याने उभारण्यात येणारे हे नाट्यसंकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असणार आहे.

नाट्यगृहांना दर काही वर्षांनी डागडुजी करून नवी झळाळी द्यावी द्यावी लागते. परंतु डागडुजीवर कोट्यवधींचा खर्च न करता नाट्यसंकुलाची नव्याने उभारणी करण्याचा निर्णय सोमवारी परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. यात केवळ एक रंगमंच नसेल तर व्यावसायिक, प्रायोगिक, बालरंगभूमी याचा विचार करून हे बांधण्यात येणार आहे.

नाटक जाणून घेण्यासाठी आलेल्या विदेशी पाहुण्यांसाठीही इथे खास सोय असणार आहे. स्वतंत्र ग्रंथालय आणि नव्या पिढीला नाट्य प्रशिक्षण घेता येईल याचेही नियोजन नव्या नाट्यगृहात असणार आहे. परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अभिनेते राजन भिसे आर्किटेक्ट असल्याने त्यांच्या मार्गदर्शनखाली हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा