रेस्पायर लिव्हिंग सायन्सेसच्या नवीन अहवालानुसार एमएमआर (MMR) मधील अनेक भागात हवेची गुणवत्ता (air quality) खालावली आहे. मुंबई (mumbai), पुणे (pune) आणि नागपूरमध्ये (nagpur) हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली असली तरी, ही शहरे अजूनही प्रदूषणाच्या (pollution) विळख्यात आहेत.
AtlasAQ प्लॅटफॉर्मचा वापर करून 2019 ते 2024 या कालावधीतील पार्टिक्युलेट मॅटर (PM) 2.5 डेटा काढला गेला. या डेटाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रातील 19 पैकी 10 शहरांमध्ये PM 2.5 नुसार प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे.
NCAP चे 2019-20 पासून 2025-26 पर्यंत हवेतील प्रदूषण 40 टक्क्यांपर्यंत पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
नवी मुंबई (navi mumbai), औरंगाबाद आणि जालना शहरे स्वच्छ हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावत आहेत. नवी मुंबईत 2023 मध्ये PM 2.5 61.80 मायक्रोग्राम प्रति घनमीटर (µg/m³) नोंदवली होती.
तसेच ठाणे (thane), बदलापूर, उल्हासनगर, चंद्रपूर, जळगाव, नागपूर आणि सोलापूरसह इतर शहरात सातत्याने पातळी खालावत आहे. या शहरांची PM 2.5 पातळी घसरत आहे. हे फार चिंताजनक आहे.
याउलट मुंबई आणि नागपूरमध्ये सुधारणा दिसून आली आहे. मुंबईतील PM 2.5 पातळी 2023 मधील 49.75 µg/m³ वरून 2024 मध्ये 28.82 µg/m³ पर्यंत घसरली. त्याचप्रमाणे, नागपूरची पातळी 2023 मध्ये 51.35 µg/m³ वरून 40.53 पर्यंत घसरली आहे.