अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील दोन दिवसांत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या आठवडाअखेरीस मुंबई, ठाण्यासह कोकणात पाऊस कोसळणार आहे.
7 जूनपर्यंत अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा इशारा देत IMD ने म्हटले आहे की जर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले तर त्याला चक्रीवादळ बिपरजॉय असे नाव दिले जाईल.
हवामान विभागाने म्हटले आहे की दक्षिणपूर्व अरबी समुद्रात 5 जून ते 7 जूनपर्यंत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना IMD अहमदाबादच्या संचालक मनोरमा मोहंती म्हणाले, "5 जून रोजी दक्षिणपूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे 7 जूनपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल."
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे वादळ गुजरातच्या दिशेने सारकण्याचा अंदाज काही खासगी संस्थांनी वर्तवला आहे.
चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २७ अंश सेल्सिअस असावे लागते. सध्या अरबी समुद्राचे तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास असून ते चक्रीवादळास अनुकूल आहे.
या चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पुढील ४८ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई आणि कोकण प्रदेशासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि अचानक पूर येण्याची शक्यता आहे.
मुंबईसह अनेक उपनगरात 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून सायंकाळी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, किमान तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअस राहील.
हेही वाचा