बृहन्मुंबई महापालिकेकडून मुंबईतील (mumbai) वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाही गोरेगावच्या (goregaon) रहिवाशांनी (residents) त्यांच्या परिसरात आणि जवळपासच्या प्रदेशात हवेच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
त्यांनी या समस्येकडे पुरेसे लक्ष का दिले जात नाही असा प्रशासनाला सवाल केला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता (air quality) खालावली आहे. अनेक भागात 'खराब' हवेची सातत्याने नोंद होत आहे. काही परिसर वगळता इतर भागातही हीच परिस्थिती असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गोरेगावमधील गोकुळधाम (gokuldham), साईबाबा कॉम्प्लेक्स, एनएनपी (NNP) आणि मालाड पूर्व (malad) भागात नागरिकांना प्रदूषित हवेचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी आरे परिसरातही काहीशी अशीच स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आरेच्या अंतर्गत भागात रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सकाळपासून या भागात दृश्यमानता कमी होती. हवेत धुळीचे प्रमाण जास्त आणि ऑक्सिजन कमी असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुंबईतील वायू प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोरेगावच्या स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्याचबरोबर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यावर बंधने घालायला हवीत, त्याशिवाय हवेचं प्रमाण शुद्ध राहू शकत नाही, असेही म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत वायू प्रदूषणाचे सत्र सुरूच आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत यंदा कोणतीही सुधारणा झालेली नाही. नोव्हेंबर महिन्यापासून हवेची गुणवत्ता 'खराब' आहे.
प्रदूषित हवेमुळे श्वसनाचे विकार, त्वचेचे विकार अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी मास्कचा वापर सुरू केला आहे.
हेही वाचा