Advertisement

मुंबईसह 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

येत्या काही तासांत दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
SHARES

अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईकरांना (Mumbaikar) दिलासा दिला आहे. आज (१८ जून) रोजी मुंबईतील काही भागांत पावसाने हजेरी लावली. मुंबईसह काही भागात मंगळवारपासून पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.

मंगळवारपासून मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस झाला. रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. तर आज बुधवारीही पाऊस कोसळत आहे. पहाटेपासूनच आकाशात काळे ढग दाटून आले आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शहर आणि उपनगरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही भागात येत्या काही तासात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, 18 जून ते 25 जून यादरम्यान मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.

तसेच, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार पावसाचा (Mumbai Rains) इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस बरसेल. तर, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातीलही काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

येत्या 48 तासात मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून कमाल 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सरासरी तापमान 26.8 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आग्नेय दिशेने 5.6 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. 

IMD च्या सात दिवसांच्या अंदाजानुसार, या आठवड्यात पावसासह किमान तापमानात किंचित घट अपेक्षित आहे. गुरुवारचे किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे, शुक्रवार आणि शनिवारी ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.

रविवार ते मंगळवारपर्यंत तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मान्सूनची (Monsoon) तीव्रता वाढत आहे. लवकरच शहरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात 4-5 अंश सेल्सिअसने लक्षणीय घट होईल.



हेही वाचा

21 जूनपासून मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

नवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा