Advertisement

मुंबईतील हवेची गुणवत्ता निरिक्षण करण्यासाठी 7 मोबाईल व्हॅन तैनात

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) सात मोबाईल व्हॅन विकत घेतल्या आहेत.

मुंबईतील हवेची गुणवत्ता निरिक्षण करण्यासाठी 7 मोबाईल व्हॅन तैनात
SHARES

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) सात मोबाईल व्हॅन विकत घेतल्या आहेत. या व्हॅन्सच्या मदतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शहरातील वातावरणावर लक्ष ठेवू शकेल.

जसजसा हिवाळा जवळ येतो तसतसे, हवेच्या गुणवत्तेबद्दलच्या तक्रारी वाढतात. तथापि, MPCB ला सध्याच्या पायाभूत सुविधांमधील मर्यादा आणि पारंपारिक मॅन्युअल मॉनिटरींग पद्धतींच्या अकार्यक्षमतेमुळे या तक्रारींची त्वरीत चौकशी करण्यात अडचणी येतात. या व्हॅन मुंबईतील विविध भागांमध्ये तैनात केल्या जातील, ज्या भागात सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

“या आव्हानांना तोंड देण्यासाठी, MPCB ने अत्याधुनिक PM10 आणि PM2.5 विश्लेषकांसह पाच नवीन व्हॅन सुसज्ज केल्या आहेत. तर उर्वरित दोन विशेषत: जमिनीच्या पातळीवर ओझोनचे निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत,” अशी माहिती MPCB चे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी दिली. 

MPCB च्या रीडिंगनुसार, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी वातावरणीय वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 115 वर “मध्यम” होता, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चेंबूरमध्ये रिफायनरीज आणि बांधकाम कामे अधिक होत असतानाही तिथे 40 म्हणजे सर्वात कमी AQI पातळी दर्शविली.

पूर्व उपनगरात जानेवारीमध्ये शहरातील सर्वात वाईट AQI नोंदवला गेला होता जो की  263 होता. तर मंगळवारी मुंबईसाठी एकूण AQI पातळी 56 वर म्हणजेच “समाधानकारक” होती.

0-50 मधील AQI “चांगला” मानला जातो, 51-100 “समाधानकारक”, 101-200 “मध्यम”, 201-300 “खराब”, 301-400 “अत्यंत खराब” आणि 401-500 किंवा वर "गंभीर" मानला जातो.



हेही वाचा

प्रदूषण नियंत्रणासाठी BMC कडून नियमावली जाहीर

नवी मुंबई: फ्लेमिंगोच्या संरक्षणासाठी एलईडी दिवे बदलणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा