Advertisement

मंगळवार ठरला यंदाचा सर्वांत उष्ण दिवस

सांताक्रूझमध्ये 39 अंश तापमानाची नोंद

मंगळवार ठरला यंदाचा सर्वांत उष्ण दिवस
SHARES

उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला नसतानाही मंगळवारी मुंबई आणि परिसरातील तापमानात अचानक वाढ झाली. उपनगरांतील पारा 39 अंशापार गेला. वाऱ्याच्या प्रतिचक्रीय स्थितीमुळे पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे सक्रिय असल्याने चढ्या तापमानाचा सामना करावा लागला. बुधवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला नसला तरी उष्ण आणि दमट वातावरण राहील, अशी शक्यता आहे.

उन्हाऴयाच्या हंगामाचा दुसराच महिना असूनही उन्हाच्या तीव्र चटक्यांचा अनुभव येत आहे. महिन्याच्या सुरुवातीला मुंबई परिसरासह कोकण विभागात उष्ण्तेच्या लाटा निर्माण झाल्या. आठवडाभर सातत्याने वाढत गेलेल्या मुंबईच्या तापमानाने मंगळवारी कळस गाठला.

घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या असह्य झळा सोसाव्या लागत होत्या. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी 39.2 अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे 38 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल 6 अंशांनी अधिक आहे.

वाऱ्याच्या प्रतिचक्रीय स्थितीमुळे तसेच पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान वाढ झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तापमानाची जाणीव प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक होईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.



हेही वाचा

BMC च्या मार्गदर्शक सूचना जारी">उष्माघात प्रतिबंधासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना जारी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा