Advertisement

सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

अहवालात मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धूळीमुळे होणाऱ्या प्रदूषणात मुंबई विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. यात मुंबईतल्या इतर भागांची नावं देख

सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर
SHARES

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा २०१८-१९ चा प्रदूषण अहवाल जाहीर झाला आहे. या अहवालात मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धूळीमुळे होणाऱ्या प्रदूषणात मुंबई विभागाचा दुसरा क्रमांक लागतो.

अहवालात सायन, बांद्रा, डोंबिवली ही शहरं अतिप्रदूषित असल्याचं स्पष्ट झालं आहे. मागील आठ वर्षांपासून डोंबिवली, बांद्रा, ऐरोली, पुणे, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, आणि सोलापूर इथं वायू प्रदूषण वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. वाढलेल्या प्रदूषणात SO2, NO2, RSPM, Ozone, Benzene, CO या प्रदुषकांचा समावेश आहे. सल्फर डाय ऑक्साईडचं प्रदूषण महाराष्ट्रात कमी असलं तरी मुंबई, पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात ते अधिक आहे.


वायू प्रदूषणात पहिल्या क्रमांकावर चंद्रपूरमधील एक जिल्हा तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबईतील सायन, तिसऱ्या क्रमांकावर वांद्रा, चौथ्या क्रमांकावर डोंबिवली हे क्षेत्र सर्वाधिक प्रदूषित म्हणून २०१८-१९ सालासाठी जाहीर झाले आहेत. प्रदूषण वाढीसाठी औद्योगिक प्रदूषण, डिझेल, पेट्रोल, गॅस, कोळसा ज्वलन, वाहनांची वाढती संख्या, बांधकामं, वाहतूक, कचरा जाळणं ही कारणं आहेत.

राज्यात २५ शहरातील एकूण ७२ प्रदूषणमापन केंद्राद्वारे १० हजार १६४ नमुन्यांच्या अभ्यास केल्यानंतर हा प्रदूषण अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यात बहुतेक सर्वच केंद्रातून धूलीकण प्रदूषण वाढल्याचं म्हटलं आहे.



हेही वाचा

नोव्हेंबर संपत आला तरी मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा कायम

मेट्रो भवन, कारशेड मुंबईसाठी ठरणार धोकादायक


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा