Advertisement

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

हवामान खात्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. 17 आणि 18 सप्टेंबरला कसा असेल पावसाचा अंदाज जाणून घ्या...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
SHARES

गणेशविसर्जनापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सिंधुदुर्ग- गोवा व पूर्व विदर्भा काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.

मराठवाडा, विदर्भ खान्देशातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी , नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

गणेश विसर्जनानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा खान्देश तसेच कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील आठवड्यात पावसाचा जोर हलक्या व मध्यम स्वरुपाचा राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या वर्षात सरासारीइतका पाऊस झाला आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले होते. त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला.

तर राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गणरायाच्या स्वागताला वरुणराजाची उपस्थिती होती. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. आता गणेश विसर्जनावेळीही वरुणराजा हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



हेही वाचा

हवामानाचा आता अचूक अंदाज सांगता येणार

नवी मुंबई: फ्लेमिंगोच्या संरक्षणासाठी एलईडी दिवे बदलणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा