Advertisement

युनायटेड नेशननं घेतली मुंबईच्या स्वच्छता मोहिमेची दखल


युनायटेड नेशननं घेतली मुंबईच्या स्वच्छता मोहिमेची दखल
SHARES

स्वच्छता दूत अफरोज शहाच्या पावलांवर पाऊल ठेवणाऱ्या चिनू क्वात्रा याची दखल युनायटेड नेशन इन्व्हायर्मेंट प्रोग्रामनं घेतली आहे. युनायटेड नेशन इन्व्हायर्मेंट प्रोग्रामचे प्रमुख एरिक सोहलेम यांनी चिनू क्वात्रा याचा पुरस्कार देऊन सत्कार केला. गेल्या ४० आठवड्यांपासून चिनू क्वात्रानं दादर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवली. या ४० आठवड्यात दादर समुद्रकिनाऱ्यावरील २५१ टन कचरा उचलण्यात आला आहे. फक्त चिनू क्वात्राच नाही, तर बीच क्लीनअप मोहिमेत सहभागी असणारा 'बीच प्लीज'चा संस्थापक मल्हार काळंबे, दादरचा जय श्रृगांरपूरे आणि माहिमचा इंद्रनेल सेन गुप्ता यांचा देखील सत्कार करण्यात आला.



५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या निमित्तानं युनायटेड नेशन प्रोग्राम इन्व्हायर्मेंटचे प्रमुख एरिक सोहलेम सध्या मुंबईत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व भारत करणार आहे. याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एरिक भारतात आले आहेत. युनायटेड नेशन प्रोग्राम इनवार्यमेंटनं यावर्षी 'बिटिंग प्लास्टिक पोल्युशन' ही थिम ठेवली आहे.



वर्सोवा बीचवर क्लीनअप ड्राइव्ह सुरू करणाऱ्या अफरोज शहा याच्या कामाला पाहून चिनू क्वात्रा, जय श्रृंगारपूरे प्रेरीत झाले. चिनू क्वात्रा यांनी स्वत: चा एक बीच वॉरीयर नावाचा ग्रुप सुरू केला. हा ग्रुप रविवारी दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवतो. गेल्या रविवारी त्यांच्या क्लीनअप ड्राइव्हचा चाळीसावा आठवडा होता. या रविवारी झालेल्या स्वच्छता मोहिमेत नेरुळ, माटुंगा आणि प्रभादेवी इथून जवळपास ५० स्वयंसेवक सहभागी झाले होते. यासोबतच महापालिकेचे ४ सफाई कर्मचारी देखील मदतीला होते.


 

पर्यावरण दिनानिमित्त १ जून ते ५ जून असे ५ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.  १ जूनला जुहू बीच२ ते ४ जून दादर बीच आणि ५ जून वरळी व्हिलेज अशा ठिकाणी मोहीम राबवण्यात येणार आहे.२ जूनला दादर बीचवर होणाऱ्या मोहिमेत गायक अभिजीत सावंत सहभागी होणार आहे



तुम्हाला देखील एका चांगल्या कामात हातभार लावायचा असेल, तर या स्वच्छता मोहिमेत तुम्ही सहभागी होऊ शकता. आपण सर्व या मोहिमेत सहभागी झालो, तर स्वच्छ आणि सुंदर मुंबईचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.



हेही वाचा-

मुंबईच्या समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा