Advertisement

कॅप्टन सुरेश वंजारी यांना सर्वोत्तम शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार


कॅप्टन सुरेश वंजारी यांना सर्वोत्तम शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार
SHARES

मुंबई - मुंबई येथील कॅप्टन वंजारी अकादमीचे संचालक कॅप्टन सुरेश वंजारी यांना माजी केंद्रीयमंत्री डॉ. भिष्मनारायण सिंह यांच्या हस्ते बुधवारी सर्वोत्तम शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेच्या वतीने ‘द इंडीयन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ’ च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात देशात शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री भिष्मनारायण सिंह, माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त जी.व्ही.जी कृष्णमुर्ती, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष वजाहत हबीबुल्लाह यांच्या हस्ते देशातील 52 व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात आले.

कॅप्टन सुरेश वंजारी यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील 11 व्यक्तींना या कार्यक्रमात सर्वोत्तम शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुवर्णपदक, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप होतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा