जोगेश्वरी - मनिषा वायकर यांनी पूनमनगरमधल्या शिवाई मैदानात भव्य दिवाळी मेळाव्याचं आयोजन केलंय. या मेळाव्याचं उद्घाटन शुक्रवारी जोगेश्वरी विधान क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते झालं. मेळावा 23 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाराय. कुडती, पर्स, तेरणे, दिवे, फँन्सी चप्पला, दागिने, मुखवास, फराळ असे स्टॉल्स इथं उभारण्यात आलेत. सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत हा मेळावा खुला राहणाराय. तसंच २२ ऑक्टोबरला वेशभुषा स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलंय.