लालबाग - जम्मू काश्मीरच्या कुपवाडा माछिल सेक्टरमधील हिमाच्छादित रस्त्यावरुन जात असताना तो रस्ता अचानक खचला आणि पाच जवान त्या खड्ड्यात पडले. त्यानंतर लष्कराच्या बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन त्यांना खड्ड्यातून बाहेर काढलं. रविवारी त्यांना श्रीनगर इथल्या रुग्णालयात हलवलं जात असताना या जवानांचा मृत्यू झाला. त्यांनाच श्रद्धांजली वाहण्यासाठी लालबागच्या गुरुकूल ऑफ आर्टच्या बाल चित्रकारांनी मंगळवारी चित्र फुलांची रांगोळी काढली. कृष्णा ढवळे, रामचंद्र माने, बालाजी अंबोरे, कानान थमोथरा, देवा हजाभाई परमार या जवानांचा या घटनेत मृत्यू झाला.