मुंबईत प्रत्येक सण दणक्यात साजरा होतो. मग गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव... नवरात्रोत्सवात देखील मुंबईकरांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. सलग नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते. गरबा नाईट्स हे तर नवरात्रीचं खास आकर्षण असतं. अगदी लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचेच पाय गरब्याच्या तालावर थिरकतात. साऱ्यांनाच फेर धरायला लावणारा गरबा अनुभवायचा असेल तर पुढील पाच ठिकाणे सुचवत आहोत.
नायडू क्लबतर्फे आयोजित केला जाणारा कोरा केंद्र इथला नवरात्री उत्सव १४ वर्ष जुना आहे. प्रत्येक वर्षी साधारण २ लाख भाविक या नवरात्री उत्सवात सामील होतात.
तर दर दिवशी ४० ते ५० हजार तरूण-तरूणी इथल्या गरब्याला हजेरी लावतात. सेलिब्रिटीदेखील या गरबा नाईट्सला आवर्जून भेट देतात.
बोरीवली पश्चिम इथं रंगणारा रासलीला नवरात्री हा आणखी एक मोठा गरबा आहे. हा गरबा उत्सव रासलीला या नावानं ओळखला जातो. आनंदीबाई कॉलेजजवळ साईबाबा नगर इथं हा गरबा आयोजीत केला जातो.
नावाजलेले आणि प्रसिद्ध गायक इथल्या गरब्याची शान आहेत. बॉम्बे कनव्हेन्शन अॅण्ड एक्जीबिशन सेंटर गोरेगाव इथं रंगीलोरे या नावानं हा नवरात्री उत्सव साजरा होतो. संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत चालतो.
इथले नवरात्री पूजेचे भव्य आणि दिव्य देखावे प्रसिद्ध आहेत. देवीच्या भोवतालची सजावट नेहमीच निराळी आणि अधिक शोभीवंत असते. देवीची देखणी मूर्ती पाहण्यासारखी असते. तिचे सुंदर रूप पाहून तुमच्या डोळ्याचे पारणे फिटतील. यासोबतच प्रसिद्ध गायकांच्या तालावर थिरकण्याची मजाच वेगळी.
इथं गेल्यावर तुम्हाला एखाद्या खाऊगल्लीत आल्यासारखंच वाटेल. खवय्यांची तर एकडे चांगलीच चलती असणार आहे. कारण इथं मुघमलाई पराठा, कोलकात्याची प्रसिद्ध बिर्याणी, चिकन रोल्स, रसगुल्ला असे चविष्ट पदार्थ इथली खासियत आहे. चमचमीत पदार्थांचा आस्वाद पण घ्यायचा आणि गरबा देखील खेळायचा .कसं खाल्ल्यावर जिरलं पाहिजेच ना. वाशी इथल्या आय.सी.एल.स्कूल ग्राउंडवर रंगणा-या या नवरात्री उत्सवाला भेट द्यावीच.
हल्ली नवरात्री उत्सव बिल्डिंग्समध्ये साजरा केला जातो. या गरब्यात सामील होणं वेळखाऊ आणि खर्चिकही नसतं. मात्र, तरीही मुंबईतील वर्षानुवर्षे सुरु असणा-या नवरात्री उत्सवांची धम्माल काही निराळीच आहे. झकपक घागरा, कानात पारंपारिक झुमके आणि हातात दांडीया घेऊन गरबा खेळायचा असेल, तर मुंबईतील गरबा नाईट्समध्ये एकदा तरी सामील व्हायला हवं.
हेही वाचा -
नवरात्री स्पेशल : मुंबईतील आद्य शक्तीपीठे