एअर इंडिया कॉलनीच्या सुंदर आणि आक्रमक अशा खेळामुळे पुरुष गटात १७ व्या कलिना फुटबॉल लीग २०१७ चे विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा अव्हर लेडी इजिप्त पॅरीश चर्च स्पोर्ट्स कमिटीतर्फे आयोजित करण्यात आली होती. या लढतीत एअर इंडिया कॉलनीने आक्रमक लढत देत इंडिया एफसी संघाला २-१ अशा फरकाने मात देत विजेतेपदावर आपले नाव कोरले. पहिल्या सत्रात एअर इंडियाने १ गोल करून आघाडी घेतली होती.
कलिनाच्या अव्हर लेडी इजिप्त पॅरीश चर्च स्पोर्ट्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत इंडियन एफसीच्या कुणाल कुंचीकुर्वे याने एअर इंडियाच्या गोलकीपरकडे लांबूनच थ्रो करत एक गोल केला आणि १-० ने आघाडी घेतली. पण थोड्याच वेळात एअर इंडिया संघाच्या विक्रम सिंहने इंडिया एफसीला चोख उत्तर देत १-१ अशी बरोबरीत घेतली. त्याच्या या गोलामुळे एअर इंडीया संघ उत्साहात आला. स्ट्रायकर कृष्णा सिंहने केलेला शेवटचा गोल हा संघाच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरला.
याआधी मीडिया संघ विरुद्ध ओएलईपीसीमध्ये झालेल्या लढतीत मीडिया संघाने १-० ने विजय मिळवत जेतेपद पटकावले. मीडिया टीम संघातील स्टिव्हन डायस या खेळाडूने एकमेव गोल करत संघाला विजयी करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.