पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ११९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे. तर कामोठे आणि नवीन पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ११९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील सापडलेल्य़ा नवीन रूग्णांमध्ये कामोठ्यातील ३१, खारघरमधील २७, नवीन पनवेलमधील २०, कळंबोलीतील १४, पनवेलमधील १२, खांदा कॉलनीतील ७, घोटकँप येथील ४ तसंच नावडे, धरणा कँप, पेणधर आणि तळोजा फेज-२ येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ६३४३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ४७३७ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १५४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४५२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.
दहावीचा निकाल जाहीर, यावर्षीही मुलींचीच बाजी