जे जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एका २२ महिन्यांच्या बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत त्या बालकाचे वडील वसीम शेख यांनी जे. जे. रुग्णालय प्रशासन आणि बाळावर उपचार करणारे डॉक्टर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पण, अजूनही या सर्व प्रकरणी ठोस कारवाई किंवा चौकशी सुरू करण्यात आलेली नाही.
शेख कुटुंबियांचा आरोप
जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनीच आपल्या मुलाची हत्या केली, असा आरोप वाळीव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे वसीम शेख (३३) यांनी केला आहे. कुत्र्याने मुलाचा चावा घेतलेला नसताना मुलामध्ये रेबीजची लक्षणं आढळली या निव्वळ अंदाजावर उपचार केल्याचा दावा शेख कुटुंबीयांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
२६ मार्चच्या रात्री अजान शेख हा २२ महिन्यांचा बालक झोपेतूत दचकून जागा झाला आणि घाबरल्यासारखा करू लागला. त्यामुळे वसीम यांनी त्याला आधी वांद्र्याच्या लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन गेले. तेव्हा लिलावतीतील डॉक्टरांनी बालकामध्ये रेबीजची प्राथमिक लक्षणे आढळल्याचं सांगितलं. आणि पुढील उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी मुलाला जे. जे. मध्ये दाखल करा असा सल्ला दिला. जे.जे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलावर तत्काळ उपचार सुरू केले.
शेख यांनी जे. जे पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, २८ मार्चला संध्याकाळी एक महिला शिकाऊ डॉक्टर अजानच्या थुंकीचा नमुना घेत होती. त्यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या अजानच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला. अजानच्या घशात टाकलेली नळी काढत असताना त्याच्या घशाला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाल्याचा आरोप वसीम शेख यांनी केला आहे.
रक्तस्त्राव का होतो हे विचारलं असता तिथल्या डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. या दरम्यान अजानच्या प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे तत्काळ रक्ताची जुळवाजुळव केली. महिला डॉक्टरने अजान पुढचे जेमतेम दोन दिवस जगू शकेल, त्याची प्रकृती नाजूक आहे, असं देखील सांगितलं. २९ मार्चला त्याचे एक्स-रे करायचे आहेत, देखील तेथील डॉक्टरांनी सांगितलं. पण, तिथे कार्यरत असणाऱ्या इतर डॉक्टरांनी एक्स-रे करता येणार नसल्याचं सांगितलं.
३० मार्चला मणक्यातील पाण्याचे आणि अन्य नमुने, आवश्यक ती कागदपत्रे हाती देत जे. जे. तील डॉक्टरांनी याची चाचणी बंगळुरु येथील निम्हंस रुग्णालयात करावी लागेल, असं सांगितलं. तेथील चाचणीत अजानला रेबीज नसल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला. रविवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४ यावेळेत वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने अजानचा व्हेंटिलेटर सहा ते सात वेळा बाजूला करून त्याच्यावर नैसर्गिकरीत्या उपचार करण्याचे प्रयत्न केले. पण, अखेर ४च्या सुमारास त्यांनी अजानचा मृत्यू झाल्याचं कळवलं, असं वसीम यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आम्ही जे. जे. पोलीस स्टेशनमध्येच तक्रार दिली आहे. पण, हेल्थ कमिटीही जे. जे. रुग्णालयाचीच असल्याकारणाने लागणारा निर्णयही रुग्णालयाच्या बाजूनेच लागणार. तरीही आम्ही न्याय मिळेल याची अपेक्षा करतो.
- वसीम शेख, अजानचे वडील, पोलीस शिपाई, वाळीव पोलीस ठाणे