Advertisement

नवी मुंबईत नवीन २२ लसीकरण केंद्र सुरू, 'ही' आहे यादी

सद्या नवी मुंबई महापालिकेच्यावतीने ३४ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ सहजपणे लस घेता यावी यासाठी आणखी २२ नवीन लसीकरण केंद्रे सुरु केली आहेत.

नवी मुंबईत नवीन २२ लसीकरण केंद्र सुरू, 'ही' आहे यादी
SHARES

कोविड (covid) च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाला अधिक गती मिळावी व नवी मुंबई (navi mumbai) तील कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नवीन २२ लसीकरण केंद्र (vaccination centers) १६ जूनपासून सुरू करण्यात आली आहेत. नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) सुरू केलेल्या या लसीकरण केंद्रांमध्ये विनामूल्य लसीकरण होणार आहे.

सद्या नवी मुंबई महापालिकेच्यावतीने ३४ लसीकरण केंद्रे (vaccination centers) कार्यान्वित आहेत. नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ सहजपणे लस घेता यावी यासाठी आणखी २२  नवीन लसीकरण केंद्रे सुरु केली आहेत. यामध्ये आवश्यकतेनुसार आणखी वाढ करण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे. लस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीस  मोठ्या प्रमाणात त्रास झालेला नसून ही लस पूर्णत: सुरक्षित आहे, याची नोंद घेऊन नागरिकांनी लस घ्यावी असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.

ही आहेत नवीन लसीकरण केंद्र

अ.क्र.

लसीकरण केंद्राचे नाव

अ.क्र.

लसीकरण केंद्राचे नाव

नमुंमपा शाळा क्र. २४ हनुमान नगर

नमुंमपा शाळा क्र. ३० कोपरीगांव

नमुंमपा शाळा क्र. ४१ अडवली भुतावली

नमुंमपा शाळा क्र. ३६ कोपरखैरणेगांव

नमुंमपा शाळा क्र. १ बेलापूर गांव सीबीडी

नमुंमपा शाळा क्र. २ दिवाळेगांव, सीबीडी

नमुंमपा शाळा क्र. ६ करावेगांव

नमुंमपा शाळा क्र. १६ शिवाजीनगर नेरुळ १

नमुंमपा शाळा क्र. १० नेरुळ २

१०

नमुंमपा शाळा क्र. १२ सारसोळे, कुकशेत

११ 

नमुंमपा शाळा क्र. १५ शिरवणेगांव, शिरवणे

१२

नमुंमपा शाळा क्र. २९ जुहूगांव

१३ 

नमुंमपा शाळा क्र. २७ वाशीगांव

१४

नमुंमपा शाळा क्र. ७४ सेक्टर २, कोपरखैरणे, महापे

१५

नमुंमपा शाळा क्र. ४२ चिंचआळी, घणसोली

१६



नमुंमपा शाळा क्र. ४६ गोठिवली, नोसिलनाका

१७ 

नमुंमपा शाळा क्र. ९१ सेक्टर ७ राबाडा

१८ 

नमुंमपा शाळा क्र. ५५/१ ४  कातकरीपाडा

१९ 

नमुंमपा शाळा क्र. ४९ ऐरोलीगांव

२० 

नमुंमपा शाळा क्र. ५३ चिंचपाडा

२१

नमुंमपा शाळा क्र. ५२ दिघा

२२

नमुंमपा शाळा क्र. ५६ इलठणपाडा

 


हेही वाचा -

शाब्बास धारावीकर! सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णसंख्या

पेट्रोल पुन्हा महागलं; मुंबई-पुण्यात प्रति लिटर १०२ पार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा