Advertisement

रक्तपेढ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी

नियमानुसार रक्तपेढ्यांमध्ये शहराच्या एकूण लोकसंख्येच्या १ टक्का रक्त जमा असणं आवश्यक आहे. त्यानुसार राज्यात पुरेसा रक्तपुरवठा असल्याचं दीपक सावंत यांनी सांगितलं. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्व रक्तपेढ्याना दररोजचा रक्ताचा उपलब्ध साठा, प्रक्रिया शुल्क, अतिरिक्त चाचणी शुल्क रक्तपेढीच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती सावंत यांनी दिली.

रक्तपेढ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी
SHARES

शासकीय रक्तपेढ्यांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक शुल्क आकारण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं असून या प्रकरणी मुंबईतील २५ रक्तपेढ्यांकडून खुलासा मागवण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.

संबधित रक्तपेढ्यांच्या खुलाशामध्ये प्रक्रिया शुल्काच्या माहितीमध्ये अतिरिक्त चाचणी, विशेष चाचणी शुल्काचा समावेश असल्याचं नमूद करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. तरीही एफडीए आणि आरोग्य विभाग यांची संयुक्त समिती यांचा अहवाल पुढील एक महिन्यात सादर करून त्यावर कार्यवाही करेल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.



खुलासा मागवला

माहिती आयोगाच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीनुसार राज्यातील ७२ खाजगी व धर्मादाय संस्था संचालित रक्तपेढ्यांकडून ज्यादा शुल्क आकारणी संबंधात खुलासा मागवण्यात आला आहे. २०१७ मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत एफडीएच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या एक रक्तपेढीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तर १३ रक्तपेढ्यांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आल्याची माहिती दीपक सावंत यांनी दिली.

Advertisement


पुरेसा रक्तसाठा

नियमानुसार रक्तपेढ्यांमध्ये शहराच्या एकूण लोकसंख्येच्या १ टक्का रक्त जमा असणं आवश्यक आहे. त्यानुसार राज्यात पुरेसा रक्तपुरवठा असल्याचं दीपक सावंत यांनी सांगितलं. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्व रक्तपेढ्याना दररोजचा रक्ताचा उपलब्ध साठा, प्रक्रिया शुल्क, अतिरिक्त चाचणी शुल्क रक्तपेढीच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती सावंत यांनी दिली.


रक्तपेढीसाठी हेल्पलाईन क्रमांक

राज्यात राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्यामार्फत एक नंबर दिला जाईल आणि तो सामान्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक असेल, असं अश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिलं. सामान्यांना रक्तपेढीच्या माहितीसाठी असा एखादा क्रमांक असावा जिथे त्यांना आवश्यक माहिती मिळेल, अशी तरतूद करता येईल का? असा प्रश्न हेमंत टकले यांनी केला होता.

Advertisement



हेही वाचा-

‘ऑपरेशन रेडिनस 2017’ - रक्त मिळवणं आता होणार अधिक सोपं!

रक्त घेताय? मग नॅट तपासणी कराच...

आता, खासगी रुग्णालयातही सहज मिळेल रक्त!


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा