कोरोनापाठोपाठ आता मलेरिया, डेंग्यू या पावसाळी आजारांना डोकं वर काढलं आहे. मलेरिया व डेंग्यूची उत्पत्तीस्थानं नष्ट करण्याची विशेष मोहीम पालिकेच्या कीटक नाशक विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत १ जानेवारी ते २४ ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये डेंग्यूची ३५,१५१, तर मलेरियाची ८४५६ उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत.
डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडिस डासांची ७१ लाख ५१ हजार १८० संभाव्य उत्पत्तीस्थळे तपासण्यात आली. यापैकी ३५ हजार १५१ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळून आल्याने ती स्थळे नष्ट करण्यात आली. मलेरिया प्रसार करणाऱ्या एनोफिलीस डासांची २ लाख ५७ हजार ९०९ उत्पत्तीस्थानें तपासण्यात आली. यामध्ये ८ हजार ४५६ ठिकाणी एनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळून आल्याने ती नष्ट करण्यात आली. या व्यतिरिक्त पाणी साचू शकतील अशा ३ लाख २३ हजार ५७९ एवढय़ा छोटय़ा-मोठय़ा वस्तू आणि ११ हजार १५३ टायर्स महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे हटवण्यात आले आहेत.
पालिकेच्या ए विभाग ते जी उत्तर विभागांमध्ये ६ ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत कीटकनाशक विभागामार्फत एकूण ६ हजार ५०८ इमारती तपासण्यात आल्या. या तपासणीत एनोफिलीस डासांची ८२९ उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली.
महापालिकेच्या जी दक्षिण विभागात कीटकनाशक विभागाच्या अतिरिक्त पथके पाठवण्यात आली होती. या पथकांद्वारे २० हजार २३२ उत्पत्तीस्थाने तपासण्यात आली. त्यात एनोफिलीस डासांची १५२ उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली. तर ई विभागात एकूण ४ हजार ३२६ संभाव्य उत्पत्तीस्थाने तपासण्यात आली. यामध्ये एनोफिलीस डासांची एकूण १६३ उत्पत्तीस्थाने आढळून आली.
डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडिस डासांची ७१ लाख ५१ हजार १८० संभाव्य उत्पत्तीस्थळे तपासण्यात आली. यापैकी ३५ हजार १५१ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळून आल्याने ती स्थळे नष्ट करण्यात आली. मलेरिया प्रसार करणाऱ्या एनोफिलीस डासांची २ लाख ५७ हजार ९०९ संभाव्य उत्पत्तीस्थाने तपासण्यात आली. ज्यापैकी ८ हजार ४५६ ठिकाणी एनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळून आल्याने ती स्थळे नष्ट करण्यात आली.
हेही वाचा -
दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात महापालिकेची विशेष मोहीम
मुंबईत पावसाला सुरुवात, पुढच्या २४ तासासाठी हवामान खात्याचा इशारा