Advertisement

कल्याण डोंबिवलीत ४१३ नवीन कोरोना रुग्ण, ५ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे नवीन ४१३ (corona) रुग्ण आढळले. तर ५ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत ४१३ नवीन कोरोना रुग्ण, ५ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली (kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे नवीन ४१३ (corona) रुग्ण आढळले. तर ५ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी २५८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ७९, कल्याण प ११४, डोंबिवली पूर्व १२१, डोंबिवली प ७६, मांडा टिटवाळा १६, मोहना ६, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे.पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३९,१७२ झाली आहे. यामध्ये ५१४८ रुग्ण उपचार घेत असून ३३,२५१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ८ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा -
भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू 
मनसेच्या नेत्यांचा बेकायदा लोकल प्रवास.!




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा