Advertisement

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४९८ नवे रुग्ण

दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी ६२७ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४९८ नवे रुग्ण
SHARES

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी तब्बल ४९८  नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १४ हजारांच्या वर गेली आहे. 

 दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी ६२७ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण  रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ७४ झाली आहे. यामधील ६२९५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ७५६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यत २१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी सापडलेल्या नवीन ४९८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व १२४, कल्याण प.१४३, डोंबिवली पूर्व १२७, डोंबिवली प ७४, मांडा टिटवाळा १२, मोहना १५ आणि पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.



हेही वाचा -

धारावी कोरोनामुक्तीकडे, अवघे 'इतके' आहेत अ‍ॅक्टिव रुग्ण

शंभरीतील आजोबांची कोरोनावर मात, रुग्णालयातच केला १०१ वा वाढदिवस साजरा




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा