राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या रोज १ हजारपेक्षा अधिक वाढत आहे. मात्र, मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. अनेक विभागात कोरोना नियंत्रणात आला आहे. पण अजूनही मुंबईतील काही विभागांमध्ये रुग्णसंख्या मोठी वाढत आहे. अंधेरी पूर्व भागात रुग्णांची संख्या आकडा ७ हजारांच्या वर गेली आहे.
अंधेरी पूर्वमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मुंबईतला हा पहिला वॉर्ड आहे जिथे रुग्णांच्या संख्याने ७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अंधेरी पूर्वमधील एकूण रुग्णसंख्या ७००५ झाली आहे. अंधेरी पूर्वेत मृत्यूही सर्वाधिक ४४२ आहेत. मुंबईत तर ६ हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या वॉर्डांची संख्या ५ झाली आहे. मुंबईत सोमवारी ११०१ रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या १०९१६१ झाली आहे.
बीएमसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २५ जुलैपर्यंत मालाडमधील कोरोना रुग्णांची संख्या ६५८३ वर गेली आहे. तर दहिसरमध्ये २६ जुलैपर्यंत कोरोनाचे २६१६ रूग्ण आढळले आहेत. २६ जुलैपर्यंत बोरिवलीमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९९४ वर पोहोचली आहे. तर २५ जुलैपर्यंत कांदिवली मधील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ४७८० झाली आहे.
हेही वाचा -