ठाणे येथील एका 90 वर्षीय आजींनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना येथील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती बुधवारी डॉक्टरांनी दिली. ठाणे जिल्ह्यात 7 वर्षीय मुलासह 121 नवीन रुग्ण सापडले आहेत.
मंगळवारी रात्री उशीरापर्यंत ठाणे येथील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1399 झाली आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, 90 वर्षांच्या आजी कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत. त्यांना आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
ठाणे जिल्ह्यात सापडलेल्या कोराना रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीतील 452, नवी मुंबईतील 395, कल्याण-डोंबिवलीतील 224, मीरा-भायंदरचे 189, ठाणे ग्रामीणचे 50, बदलापूरचे 42, भिवंडी निझामपूरचे 20, उल्हासनगरचे 16 आणि अंबरनाथ महापालिका हद्दीतील 11 जणांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काम करणाऱ्या किंवा राहणाऱ्यांना 8 मे पर्यंत कल्याण डोंबिवलीत प्रवेश किंवा त्यातून बाहेर पडता येणार नाही. भिवंडीतील भाजप खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे, की त्यांनी कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या कामाच्या ठिकाणीच करावी.
दरम्यान, कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत 1000 बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. चीनमधल्या वुहानमध्ये जसे हॉस्पिटल उभारण्यात आले होते त्याच धर्तीवर मुंबई आणि ठाण्यात हे हॉस्पिटल उभं राहात आहे. नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला याबाबत आदेश दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
हेही वाचा -