Advertisement

नाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी

मोदी सरकारनं भारत बायोटकेच्या Intranasal Booster Dose ला मंंजुरी दिली आहे.

नाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी
SHARES

आता नाकावाटेही कोरोना लस दिली जाणार आहे. मोदी सरकारनं भारत बायोटकेच्या Intranasal Booster Dose ला मंंजुरी दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (Drugs Controller General of India) इन्ट्राननेझल बुस्टर डोसच्या ट्रायलला परवानगी दिली आहे.

डीसीजीआयच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीनं (SEC) कंपनीच्या इन्ट्रानेझल कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसच्या ट्रायलसाठी प्राथमिक मंजुरी दिली आहे. भारतातातील ही पहिली अशी लस आहे, जी नाकावाटे दिली जाईल. या लशीत ओमिक्रॉनसह कोरोनाच्या इतर व्हेरिएंटलाही रोखण्याची क्षमता असल्याचं सांगितलं जातं आहे.

भारतात १० जानेवारी, २०२२ पासून बुस्टर डोस द्यायला सुरुवात करण्यात आली. कोरोना योद्धा, हेल्थकेअर आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासोबत ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि इतर आजार असलेल्या लोकांना बुस्टर डोस दिला जातो आहे.

नझल व्हॅक्सिनबाबत याआधी बोलताना भारत बायोटेकचे कृष्णा इल्ला यांनी सांगितलं होतं की, संपूर्ण जगलाल अशी लस हवी आहे. संसर्ग रोखण्याचा हा एकमेव मार्ग आहे. कोरोना लशीच्या दोन डोसनंतर तिसरा डोस देण्याची ही योग्य वेळ आहे. बहुतेक लोक इम्युनोलॉजीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भारत बायोटेकनं ती मिळवली आहे.

देशातील Covishield आणि Covaxin या अँटी-कोविड-१९ लसी (Anti Covid-19 vaccines) लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. या दोन्ही लसींना लवकरच त्यांच्या विक्रीसाठी भारताच्या औषध नियामकाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याची किंमत प्रति डोस २७५ रुपये असण्याची शक्यता आहे आणि १५० रुपये अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाऊ शकतात.



हेही वाचा

Covishield, Covaxin लसी खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी

मुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमिक्रॉन व्हेरियंटचे - BMC

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा