Advertisement

बाल लैंगिक अत्याचारात ३൦൦ टक्यांनी वाढ


बाल लैंगिक अत्याचारात ३൦൦ टक्यांनी वाढ
SHARES

मुंबईसह राज्यात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. दिवसेंदिवस लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात तर दर १५ मिनिटांनी एका लहान मुलावर अत्याचार होत असून बाल लैंगित अत्याचारात ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्राय (चाइल्ड राइट्स अँड यू) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
क्रायने केलेल्या सर्वेक्षणात गेल्या दहा वर्षांत लहान मुलांवरील अत्याचारांत ५०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. २०१६ मध्ये १ लाख ०६ हजार ९५८ अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत.


धक्कादायक माहिती उघड

२००६ मध्ये या प्रकारच्या घटनांचं प्रमाण १८ हजार ९६७ होतं. २०१२ ते २०१६ पूर्वीच्या पाच वर्षांच्या तुलनेत (२००६ ते २०११) मध्ये या घटनेत वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषणशाखेच्या (एनसीआरबी) माहितीनुसार, भारतातील लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारात २०१५ ते २०१६ दरम्यान १४ टक्के वाढ झाली आहे.

२०१६ मध्ये क्राइम्स अंडर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोस्को) कायद्यानुसार, एकूण गुन्हेगारीमध्ये लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण एक तृतीयांश आहे. भारतात दर १५ मिनिटाला एक लहान मुलावर लैंगिक अत्याचार होतात ही बाब निश्चितच धोकादायक असल्याची धक्कादायक बाब क्राय या संस्थेच्या सर्वेक्षण यातून पुढे आले आहे.


बलात्काराच्या प्रमाणात वाढ

गुन्ह्याचे स्वरूप आणि प्रकार पाहाता दाखल करण्यात आलेल्या केसेसच्या संख्येनुसार, लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण १८ टक्क्यांवर आहे, तर अपहरण आणि खंडणी पहिल्या क्रमांकावर आहे.

२०१६ मध्ये नोंदवल्यानुसार त्याचे एकूण गुन्ह्यांतील प्रमाण निम्मे (५४७२३ गुन्ह्यांपैकी ५१.१ टक्के) आहे. पोस्को कायद्याअंतर्गत एकूण गुन्ह्यांपैकी अंदाजे ३३ टक्के गुन्हे लहान मुलांशी संबंधित असतात. गेल्या ५ वर्षांत लहान मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचांराचे नोंदले गेलेले प्रमाण ३०० टक्क्यांनी वाढले असून ही बाब निश्चितच धोकादायक आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा