Advertisement

coronavirus update: महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मंजुरी

कोरोना उपचारासाठी (coronavirus) महाराष्ट्रात पूल टेस्टींग (pool testing for corona) आणि प्लाझ्मा थेरपी (plasma threapy) उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून शुक्रवारी मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

coronavirus update: महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मंजुरी
SHARES

कोरोना उपचारासाठी (coronavirus) महाराष्ट्रात पूल टेस्टींग (pool testing for corona) आणि प्लाझ्मा थेरपी (plasma threapy) उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून शुक्रवारी मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) म्हणाले, कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणं शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचं निर्जंतुकीकरण करून त्याचा पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचं विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

हेही वाचा- Coronavirus Update: मुंबईतील कोरोनाबाधितांवर होणार प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितलं.

मुंबईतील रुग्णांवरही प्रयोग

दरम्यान, याआधी मुंबईतील कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपीनुसार उपचाराचे प्रयोग केले जाणार आहेत. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज (antibidies) वाढविण्याचं काम करतील, अशी माहिती टोपे यांनी दिली होती.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) देखील कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील ८०० मिली रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून ॲण्टीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचं म्हटलं आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा