राज्यात आज १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४६ हजार ०७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३६०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ०९ हजार ३१७ नमुन्यांपैकी ९७ हजार ६४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७३ हजार ६०६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७४ हजार ४९३ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ०६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा:-आज मध्यरात्रीपासून मालाडच्या मढ भागात टोटल लॉकडाऊन
राज्यात १५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी १०२ पुरुष तर ७५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १५२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८५ रुग्ण आहेत तर ५४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १५२ रुग्णांपैकी १०७ जणांमध्ये ( ७०.३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३५९० झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ११७ मृत्यूंपैकी मुंबई ८७, मीराभाईंदर ८, कल्याण- डोंबिवली ७, सोलापूर ७, नवी मुंबई ४, नाशिक ३, वसई-विरार १ अशी नोंद आहे.
हेही वाचाः- आज मध्यरात्रीपासून मालाडच्या मढ भागात टोटल लॉकडाऊन
(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २०८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)