Advertisement

२४ तासात १२०० चाचण्या, आत्याधुनिक मशीन भारतात दाखल

झटपट कोरोना टेस्ट करणारे भारतात दाखल झालेले हे पहिलं अत्याधुनिक मशीन आहे.

२४ तासात १२०० चाचण्या, आत्याधुनिक मशीन भारतात दाखल
SHARES

देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus update) कहर दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 20 लाख नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दररोज जवळपास १ लाख सॅम्पलची टेस्ट करण्यात येत आहे. देशातील ५०४ सरकारी आणि खासगी लॅबमध्ये ही टेस्ट केली जात आहे. कमी वेळात आणखी टेस्ट करणं आवश्यक आहे. कारण जेवढ्या टेस्ट होतील तेवढी परिस्थिती हाताळणं सोप्प जाईल.

हाच विचार करून सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. कमी वेळेत जास्ट टेस्ट करण्याच्या दृष्टीकोणातून सरकारनं COBAS 6800 मशीन मागवली आहे. या मशीनच्या मदतीनं आता जास्त कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी हे मशीन नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलकडे (NCDC)सुपुर्द केलं. झटपट कोरोना टेस्ट करणारे भारतात दाखल झालेले हे पहिलं अत्याधुनिक मशीन आहे.

एनसीडीसी सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या अत्याधुनिक COBAS 6800 मशीनच्या मदतीनं कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. २४ तासांत १ हजार ४०० सॅम्पल टेस्ट करण्याची या मशिनची क्षमता आहे.

डॉ.हर्षवर्धन यांनी सांगितलं की, हे मशीन रोबोटिक्सनं परिपूर्ण आहे. त्यामुळे हेल्थकेअर वर्कर्सला इन्फेक्शनची धोका निर्माण होणार नाही. तसंच वेळेची मोठी बचत होणार आहे.

COBAS 6800 मशीनला टेस्टिंगसाठी न्यूनतम BSL2 आणि नियंत्रण लेव्हलच्या लॅबची आवश्यकता असते. मशीन कोणत्याही फॅसिलिटीवर ठेवता येत नाही. COBAS 6800 व्हायरल हेपेटाइटिस बी अॅण्ड सी, एचआयव्हा, एमटीबी, पॅपिलोमा, सीएमव्ही, क्लॅमाइडिया आणि नेयसेरेमिया सारख्या आजारांचीही टेस्ट करते.

दुसरीकडे, देशातला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 80,759 वर पोहोचली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला धडकी भरली आहे. भारतासाठी आता मे आणि जून महिला निर्णयाक ठरणार आहे. गेल्या दोनच दिवसांमध्ये तब्बल १० हजार रुग्णांची भर पडली आहे.



हेही वाचा

मंदिरातही शिरला कोरोना, कांदिवलीच्या साईधाम मंदिरातील १२ कर्मचारी पॉझिटिव्ह

COVID 19 रुग्णांसाठी मुंबईतल्या ७२ बसेसचे अॅमब्युलंसमध्ये रूपांतर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा