Advertisement

राज्यात ब्लॅक फंगसचा मृत्यू दर १२ टक्के

राज्यात नागपूरमध्ये ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो.

राज्यात ब्लॅक फंगसचा मृत्यू दर १२ टक्के
SHARES

राज्यात ब्लॅक फंगसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. राज्यात ब्लॅक फंगसचे आतापर्यंत 9,268 रुग्ण आढळले आहेत. यामधील 5091 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 2900 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

राज्यात ब्लॅक फंगसमुळे होणारा मृत्यू दर हा 12 टक्के इतका आहे. ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि मुंबईत आहेत. राज्यात नागपूरमध्ये ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागपुरात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 5121 रुग्ण सापडले आहेत. तर 152 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

पुण्यात 1241 रुग्ण सापडले असून त्या ठिकाणी 163 लोकांचा मृत्यू झाला आहे. औरंगांबादमध्ये 1043 रुग्ण तर 99 जणांचा मृत्यू, नाशिकमध्ये 659 रुग्णसंख्या तर 72 लोकांचा मृत्यू, मुंबईमध्ये 620 रुग्णसंख्या तर 104 लोकांचा मृत्यू, सोलापुरात 589 रुग्णसंख्या तर 81 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अद्याप कमी झालेली नाही. राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन 8 हजार 10 रुग्ण आढळले आहेत. तर 7 हजार 391 रूग्ण बरे झाले आहेत. तसंच 170 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असून कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातील रुग्णसंख्या वाढतच आहे. या जिल्ह्यांतील सक्रिय रुग्णसंख्याही वाढत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा