मुंबईत कोरोनाचा वेग मंदावल्याचं दिसून येत आहे. मुंबईत रुग्णवाढीचा वेग १.३९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर गेला आहे.
वांद्रे पूर्व, खार पूर्व आणि सांताक्रूज पूर्व इत्यादी परिसरांचा समावेश असलेल्या एच पूर्व विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल १४० दिवसांवर पोहोचला आहे. मशीद बंदर, सँडहर्स्ट रोड या परिसराचा समावेश असलेल्या बी विभागात ९८ दिवस, कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या 'एल' विभागात ८८ दिवस, दादर, वडाळा, माटुंगा,सायन इत्यादी परिसराचा समावेश असलेल्या 'एफ उत्तर' विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७९ दिवस आहे. उर्वरित २० विभागांपैकी १० विभागांमध्ये हा कालावधी ५० दिवसांपेक्षा अधिक आहे.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईत कोरोनाचा वेग कमी होण्यास सुरूवात झाली. १४ ते २० जून या कालावधीमध्ये ८४९८ नवीन रुग्ण आढळले होते. २१ जून ते २७ जून या आठवड्यात ८९२३, २८ जून ते ४ जुलैमध्ये ८९८५ तर ५ ते ११ जुलै या कालावधीमध्ये ८५०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी
२२ मार्च रोजी हा तीन दिवस होता. १५ एप्रिलला ५ दिवस, १२ मे रोजी १० दिवस, २ जूनला २० दिवस, १६ जून रोजी ३० दिवस, २४ जून रोजी ४१ दिवस होता. तर रविवारी १२ जुलै रोजी हा कालावधी ५० दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत रुग्ण संख्येत होणाऱ्या दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी ही दिवसेंदिवस कमी होत आहे. २४ जून रोजी हा दर सरासरी १.७२ टक्के एवढा होता. तो १२ जुलैला सरासरी १.३९ टक्के एवढा झाला आहे. विभागस्तरीय आकडेवारीनुसार सर्वांत कमी दर हा वांद्रे एच पूर्व विभागात ०.५ टक्के, डोंगरी बी विभागामध्ये ०.७ टक्के, कुर्ला एल विभागात ०.८ टक्के आणि माटुंगा एफ उत्तर विभागात ०.९ टक्के नोदविण्यात आला आहे. उर्वरित २० विभागांपैकी ११ विभागांमधील सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा हा १.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
Sealed Building List Mumbai : मुंबईतील सील केलेल्या इमारतींची 'ही' आहे यादी
उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!