Advertisement

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ६१ दिवसांवर

मुंबईतील कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र, आता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ६१ दिवसांवर
SHARES

मुंबईतील कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र, आता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी ६१ दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८१ टक्के झालं आहे.

मुंबईत मागील एका आठवडाभरात कोरोनाचे १८ हजार ९४९ नवीन रुग्ण सापडले आहेत. लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर आणि गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही घटला आहे. २० दिवसांपूर्वी मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावाधी ९३ दिवस होता. तो आता ६१ दिवसांवर आला आहे. रोज १००० ते १३०० पर्यंत आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आता दोन हजार ते २३०० पर्यंत वाढली आहे.


मुंबईत १७ ते २० सप्टेंबरपर्यंत रोज २२०० ते २३०० रुग्ण आढळले आहेत. २१ व २२ सप्टेंबरला रुग्णसंख्या घसरून १६२८ वर आली. २३ सप्टेंबरला रुग्णसंख्या पुन्हा वाढून २३६० वर पोहचली. रुग्णसंख्येत चढउतार सुरू असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.


हेही वाचा -

येत्या १ ऑक्टोबरपासून टोलदरात होणार 'इतकी' वाढ

कोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर २००० रुपये



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा