Advertisement

Coronavirus Updates: डॉक्टर संघटनेने सुरू केली हेल्पलाइन

इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) या डॉक्टरांच्या संघटनेनेही एक हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोनाबाबत शंका असणाऱ्यांनी या हेल्पलाईनवर काॅल केल्यास त्यांनी डाॅक्टरांशी थेट बोलता येणार आहे.

Coronavirus Updates: डॉक्टर संघटनेने सुरू केली हेल्पलाइन
SHARES

कोरोना व्हायरसबाबत (coronavirus) अनेक अफवा पसरल्याने सर्वसामान्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या मनात अनेक शंकाही आहेत. या शंकांचं योग्य निरसन व्हावे म्हणून मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) १९१६ ही हेल्पलाइन (helpline) सेवा सुरू केली आहे. याच धर्तीवर नागरिकांच्या मदतीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) या डॉक्टरांच्या संघटनेनेही एक हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोनाबाबत शंका असणाऱ्यांनी या हेल्पलाईनवर काॅल केल्यास त्यांनी डाॅक्टरांशी थेट बोलता येणार आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) सुरू केलेली ही हेल्पलाईन (helpline)  २४ तास सुरू राहणार आहे. कोरोनाबाबत (coronavirus) काही शंका असल्यास या हेल्पाईनवर काॅल केल्यास डाॅक्टर या शंकांचं निरसन करतील. यासाठी  इंडियन मेडिकल असोसिएशनने ९९९९६७२२३८ आणि ९९९९६७२२३९ हे क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या हेल्पलाईनवर राजन शर्मा किंवा आर. व्ही. अशोकन यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.  सोमवारपासून सकाळी दहा वाजता ही हेल्पाईन सुरू झाली आहे. हेल्पलाईनमार्फत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केली आहे. 

याआधी मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) १९१६ ही हेल्पलाइन (helpline) सुरू केली आहे. या हेल्पाईनवर काॅल केल्यास नागरिकांच्या शंकांचं निरसन आणि त्यांना हवी असणारी मदत केली जाणार आहे. 



हेही वाचा -

Coronavirus Updates: कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी सरसावली गणेश मंडळं

Corona Virus : मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा