Advertisement

जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर कार्यमुक्त


जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर कार्यमुक्त
SHARES

मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर जे. जे. रुग्णालयाच्या कार्यभारातून मुक्त होणार आहेत. त्यांची कोल्हापूरमधील छत्रपती शाहू महाराज सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवले जे.जे.च्या अधिष्ठातापदी रुजू होणार आहेत.


सात महिन्यांतच बदली 

डॉ. तात्याराव लहाने यांच्यानंतर डॉ. सुधीर नणंदकर यांची जे. जे. रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या कार्यप्रणालीला फक्त सातच महिने झालेले असताना त्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र या बदलीचं नेमकं कारण कळलेलं नाही.


चार अधिष्ठातांचं हस्तांतरण

पुणे येथील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवले मुंबईतील जे. जे. रुग्णालयात स्थानांतरित झाले आहेत. मंगळवारी नणंदकर यांच्या बदलीनंतर राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाने चार वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठातांचं हस्तांतरण केलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा