Advertisement

लोकमान्य टिळक रुग्णालयात किडनी रॅकेट?


लोकमान्य टिळक रुग्णालयात किडनी रॅकेट?
SHARES

शीव – येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातली शांतता सोमवारी सकाळी झालेल्या आंदोलनामुळे भंगली. या रुग्णालयातले डॉक्टरच किडनीचोर आहेत, असा दावा करणाऱ्या केदारे कुटुंबाला समर्थन देण्यासाठी भाजपानं हे आंदोलन पुकारलं होतं. दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रमाकांत गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. संबंधित डॉक्टरांना शिक्षा द्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलीय.

2013मध्ये तुळशीराम केदारे यांची पत्नी नंदा केदारे लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. पण नंदा केदारे यांच्या किडन्या घरच्यांच्या परवानगीशिवाय काढण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुळशीराम केदारे यांनी पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली. मात्र तीन वर्ष झाले तरी कुछलीच कारवाई झाली नसल्याने त्यांनी भाजपकडे मदतीचा हात मागितला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा