Advertisement

राज्य सरकारची 'ब्रेक द चेन' नियमावली जाहीर

राज्य सरकारनं वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ब्रेक द चेनची नियमावली जारी केली आहे.

राज्य सरकारची 'ब्रेक द चेन' नियमावली जाहीर
SHARES

राज्य सरकारनं वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ब्रेक द चेनची नियमावली जारी केली आहे. कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार दररोज रात्री ८ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू होणार आहे. तर दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (१०-११ एप्रिल) लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

  • ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह दोन प्रवाशांना परवानगी
  • टॅक्सीत ड्रायव्हरसह एकूण प्रवासी संख्येच्या ५० टक्के प्रवासी बसवण्यास परवानगी
  • सार्वजनिक वाहतुकीतील सर्वांनी मास्क वापरणं बंधनकारक, न वापरल्यास ५०० रुपये दंड
  • सार्वजनिक वाहतुकीत असणाऱ्या व्यक्तीने आपले कोव्हिड लसीकरण करुन घ्यावे
  • १० एप्रिलपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर आणि स्टाफला कोरोना निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट बंधनकारक
  • रिपोर्ट जवळ न ठेवल्यास प्रत्येकी १००० रुपयांचा दंड
  • ड्रायव्हरने गाडीत स्वतःला प्लॅस्टिक कव्हरने प्रवाशांपासून विलग ठेवल्यास RTPCR रिपोर्टची गरज नाही
  • लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामध्ये जनरल डब्यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई
  • सर्व प्रवाशांनी मास्क घालून प्रवास करण्याची गरज

महाराष्ट्रात खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

  • खाजगी वाहनधारकांसह बसेसला सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी
  • येत्या शुक्रवार ९ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी १२ एप्रिल सकाळी ७ वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही
  • केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत परवानगी
  • खासगी बसेसमधील कर्मचारी आणि स्टाफने कोरोना लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावं
  • १० एप्रिलपासून खाजगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना RTPCR चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक
  • ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी १५ दिवसाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार
  • RTPCR चाचणी नसल्यास १ हजार रुपयांचा दंड

प्रार्थना स्थळांसाठी नियम काय?

  • सर्व धार्मिक स्थळ भाविकांसाठी बंद राहणार
  • धार्मिक स्थळाशी संबंधित पुजारी, कर्मचारी फक्त धार्मिक स्थळी प्रवेश
  • धार्मिक स्थळाशी संबंधित पुजारी, कर्माचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना लसीकरण करावे

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठी ब्रेक द चेन नियम

  • सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवावे लागणार
  • रेस्टॉरंट्सना ग्राहकांना पार्सल सेवा किंवा होम डिलीव्हरी सेवा देण्यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
  • शनिवारी आणि रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत फक्त होम डिलीव्हरी सेवा सुरु राहणार, ग्राहकांना प्रत्यक्ष जाऊन जेवण पार्सल नेता येणार नाही
  • निवासी सेवा पुरवाणाऱ्या हॉटेल्सच्या बार आणि रेस्टॉरंट्सना केवळ हॉटेलमध्ये वास्तवास असलेल्या पाहुण्यांना सेवा देता येणार
  • १० एप्रिलपासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा RTPCR कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक
  • ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी १५ दिवसांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार
  • RTPCR चाचणी नसल्यास १ हजार रुपयांचा दंड
  • हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण लवकर करुन घ्यावं

दुकान , बाजारपेठा आणि माँल्स ब्रेक द चेन नियम

  • अत्यावश्यक वस्तूची दुकान , बाजार वगळता सर्व दुकानं , बाजार आणि माँल्स बंद राहतील
  • अत्यावश्यक दुकानात काम करणा-या मालकासह आणि कर्मचा-याचं लवकर कोरोना लसीकरण करणं गरजेचं
  • ग्राहक आणि दुकानदार यांच्यात पारदर्शक काच किंवा प्लाँस्टिकच्या पारदर्शक शिल्डचा वापरण करून सोशल डिस्टिंग ठेवणे महत्वाचं

महाविद्यालय आणि शाळा ब्रेक द चेन नियम

  • शाळा आणि महाविद्यालय पूर्णपणे बंद असतील
  • १० आणि १२ विद्यार्थ्यांच्या परिक्षासाठी नियमात शिथिलता असेल. 
  • परिक्षा घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेतलेली असावी किंवा कर्मचाऱ्यांचा RTPCR कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह असावा
  • हा रिपोर्ट केवळ ४८ तास ग्राह धरणार

लग्न कार्यासाठी बेक द चेन नियम

  • ५० जणांच्या उपस्थितीत लग्न कार्यास परवानगी
  • लग्न समारंभात सेवा देणाऱ्या हाॅल कर्मचाऱ्यांचं कोरोना लसीकरण झालेले असावं किंवा हाँलमधील कर्मचाऱ्याचं RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह असावं
  • RTPCR कोरोना चाचणी निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट नसल्यास १ हजार रूपायांचा दंड आणि हाँलच्या व्यवस्थापनाला १० हजार रूपायांच्या दंडाची शिक्षा
  • सतत हाँल आणि मंगलकार्यलयाकड़ून नियमाचं उल्लघंन झाल्यास संबंधित परिसर सील केला जाणार

अत्यसंस्कारासाठी ब्रेक द चेन नियम

  • २० जणांच्या उपस्थितीत अत्यसंस्कार करण्यास परवानगी
  • स्मशानभूमितील कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण केलेलं असावं किंवा RTPCR कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक

सहकारी निवासी सोसायटीसाठी ब्रेक द चेन नियम

  • सहकारी निवासी सोसायटी ५ पेक्षा कोरोना रूग्ण आढल्यास मायक्रो कंटेमेंट झोन घोषित केला जाणार
  • अशा सोसयटीनं बाहेरून येणाऱ्या सोसयटीत प्रवेश देता येणार नाही तसा फलक सोसायटीच्या दर्शनी भागासमोर लावावा लागेल
  • सोसायटीकडून या नियमाचं पालन न झाल्यास १०००० रूपायांचा दंड बसणार
  • सहकारी निवासी सोसायटीत नेहमी ये जा करणा-यांच्या RTPCR टेस्ट करून घेणं किंवा कोरोना लसीकरण करावं
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा