Advertisement

महाराष्ट्रात चौथ्या लाटेची भिती, आढळला कोविडचा नवा व्हेरिएंट

कोविड -19च्या या नव्या व्हेरियंटचं नाव डेल्टाक्रॉन आहे.

महाराष्ट्रात चौथ्या लाटेची भिती, आढळला कोविडचा नवा व्हेरिएंट
SHARES

आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा  (Corona 4th wave in India) महाराष्ट्रासह सात राज्यांना सर्वाधिक धोका आहे. कोरोनाचा एक नवा प्रकार, नवा व्हेरियंट आलेला आहे. कोरोनाची चौथी लाट येण्यामागे हा व्हेरियंट कारण ठरू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

कोविड -19च्या या नव्या व्हेरियंटचं नाव डेल्टाक्रॉन आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्हीची लक्षणं असलेला हा नवा व्हेरियंट या शब्दांच्या संगम होऊन तयार झालेला आहे. काळजीची बाब म्हणजे भारतात हा व्हेरियंट दाखल झाला आहे.

महाराष्ट्रासह सात राज्यांत त्याचे रुग्णही मिळालेले आहेत. या राज्यांमध्ये कर्नाटक, तमीळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि दिल्लीचा समावेश आहे. सध्या या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे.

ओमिक्रॉन आणि डेल्टा या कोरोनाच्या उपप्रकारांची एकत्रित लक्षणं असलेला डेल्टाक्रॉन हा एक रिकॉम्बिनंट व्हेरियंट आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये डेल्टाक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला.

पॅरिसमधील (Institute Pasteur) इन्स्टिट्युट पाश्चरमधील शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा एक नवा व्हेरियंट पाहिला होता जो आधीच्या व्हेरियंटपेक्षा पूर्ण वेगळा होता. हा डेल्टाक्रॉनचा नमुना उत्तर फ्रान्समधील एका ज्येष्ठ व्यक्तीकडून आला होता. त्याची तपासणी केल्यानंतर हा व्हेरियंट फार वेगळा वाटला. त्यातील अधिकांश जेनेटिक्स हे कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटसारखे होते.

परंतु या व्हेरियंटमधील एक भाग जो विषाणूंचा स्पाईक प्रोटिन कोड भेदून त्याआधारे कोशिकांच्या आत प्रवेश करतो तो मात्र ओमिक्रॉनमधून आलेला आहे. त्यामुळे एकाअर्थी कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन दोन्ही उपप्रकारांचं एक मिश्रण म्हणजे हा नवा डेल्टाक्रॉन आहे.

डेल्टाक्रॉनवर केलेल्या अभ्यासानुसार, या व्हेरियंटची दोन प्रमुख लक्षणं म्हणजे चक्कर येणं आणि थकवा. बाधित झाल्यानंतर 2-3 दिवसांत रुग्णाला ही लक्षणं जाणवायला लागतात. काही रिपोर्ट तर असंही सांगतात की डेल्टाक्रॉनचा परिणाम नाकापेक्षा जास्त पोटावर होतो. त्यामुळे रोग्याला मळमळ, उलट्या, जुलाब, पोटात जळजळ, सूज येणं, अपचन आदी तक्रारी जाणवतात.



हेही वाचा

आता पालिका सांडपाण्याचीही तपासणी करणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा