Advertisement

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे काढावे लागले डोळे, जाणून घ्या काय आहे 'ब्लॅक फंगस'

'ब्लॅक फंगस' हा नवीन आजार नेमका काय आहे? याची लक्षणं काय आहेत? यावर उपचार काय आहे? हे जाणून घेऊयात.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे काढावे लागले डोळे, जाणून घ्या काय आहे 'ब्लॅक फंगस'
SHARES

कोरोना इतका भयावहः होत आहे की, लोकांचा जीव वाचवण्यासाठी अवयव काढावे लागत आहेत. अशी अनेक प्रकरणे महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, दिल्ली, गुजरातमधून समोर आली आहेत. या आजाराची पहिली काही प्रकरणे डिसेंबरमध्ये समोर आली होती. या नवीन आजाराचं नाव आहे 'ब्लॅक फंगस.'(Black Fungus) 

'ब्लॅक फंगस' हा नवीन आजार नेमका काय आहे? याची लक्षणं काय आहेत? यावर उपचार काय आहे? हे  जाणून घेऊयात.


ब्लॅक फंगस काय आहे ?

हा एक फंगल डिजीज आहे, जो म्यूकॉरमाइटिसीस नावाच्या फंगाइलनं होतो. हा त्यांना होतो, ज्यांना आधीपासून एखादा आजार आहे, किंवा ते शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारे औषध-गोळ्या घेत आहेत. हे फंगस शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकते.


हा आजार कसा होतो?

फंगस श्वासाद्वारे आपल्या शरीरात जाऊ शकतो. जर शरीरावर एखादी जखम असेल, तर त्याद्वारेही हा शरीरात जाऊ शकतो. जर हा फंगस लवकर डिटेक्ट झाला नाही, तर आपली दृष्टी जाऊ शकते किंवा शरीराच्या ज्या भागावर हा झाला आहे, तो भाग काढावा लागू शकतो.


लक्षणं काय आहेत?

  • इंफेक्शनमुळे चेहरा सुजणे
  • डोके दुखणे
  • नाक बंद होते
  • उलटी येते
  • ताप,
  • छातीदुखी,
  • सायनस कंजेशन
  • तोंडामध्ये काळ्या जखमा


इंफेक्शनचा धोका कोणाला?

डायबेटीज, कँसर, ऑर्गन ट्रांसप्लांट झालेले, अनेक दिवसांपासून स्टेरॉयड वापरणारे, स्किन इंजरी झालेले आणि प्रिमॅच्योर बाळालाही हा आजार होऊ शकतो.

कोरोना असलेल्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती ही आधिच कमी असते. त्यात जर हाय डायबेटीज असेल तर त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती जास्त कमी झालेली असते, अशा लोकांमध्ये हा ब्लॅक फंगस जास्त पसरू शकतो. याशिवाय स्टेरॉयड दिलेल्या कोरोना रुग्णांनाही याची लागण होऊ शकते.


किती धोकादायक आहे ?

हा एकापासून दुसऱ्याला होणारा आजार नाही. पण हा आजार झालेल्या ५३% रुग्णांचा मृत्यू होतो.

शरीराच्या ज्या भागावर हा फंगस येईल, त्या भागाला डॅमेज करेल. मेंदूमध्ये झाल्यावर ब्रेन ट्यूमरसह अनेक आजार होऊ शकतात. मेंदुमध्ये इंफेक्शन झाल्यावर मोटर्लिटी रेट ८० टक्केपर्यंत जातो.

कोरोना काळात अनेकजण अशक्त झाले आहेत, अशात हे इंफेक्शन वाढू शकते. पण, योग्यवेळी उपचार केल्यावर याला रोखता येते.


इंफेक्शनपासून कसा बचाव कराल?

  • कंस्ट्रक्शन साइटपासून दूर रहा 
  • धुळीमध्ये न जाणे
  • गार्डनिंग
  • शेती करताना फुल स्लीव्स आणि ग्लव्ज,  मास्क घाला 
  • घाण पाणी साचलेल्या ठिकाणांपासून दूर रहा
  • कोरोना झालेल्या किंवा ठीक झालेल्या रुग्णांनी नियमत चेकअप करून घ्या. 
  • फंगससारखे एखादे लक्षण आढळत असेल, तर तात्काळ डॉक्टरांना दाखवून ट्रीटमेंट घ्या. 
  • उपचारात उशीर केल्यावर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकते.

हेही वाचा

होम क्वारंटाईन आहात? 'हे' ५ टिफिन सर्विसेस पुरवतात घरगुती जेवण

कोविडची लक्षणं आढळल्यास काय कराल?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा