Advertisement

एचआयव्हीच्या रुग्णांसाठी मुंबईत बसवणार नवीन सीडी 4 मशीन


एचआयव्हीच्या रुग्णांसाठी मुंबईत बसवणार नवीन सीडी 4 मशीन
SHARES

ह्युमन इम्यूनोडिफीसिअन्सी व्हायरस (एचआयव्ही) ने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नियमित तपासणीनंतर रिपोर्टसाठी आता वाट पाहावी लागणार नाही. कारण मुंबईतील पाच एंटीरेट्रोव्हायरल उपचार (एआरटी) केंद्रांमध्ये लवकरच नवीन सीडी फोर मशीन बसवल्या जाणार आहेत. या मशीन्स एचआयव्हीच्या रुग्णांसाठी महत्त्वाच्या आहेत. कारण या मशीन्स रुग्णांच्या सीडी 4 मोजणीवर म्हणजेच रक्तपेशींच्या संख्येची मोजणी आणि त्यांच्या रोगप्रतिबंधक शक्तीवर नजर ठवते.


ही सुविधा कुठे?

कांदिवली, गोरेगांव, मुलुंड, घाटकोपर आणि गोवंडी या पांच एंटीरेट्रोव्हायरल उपचार (एआरटी) केंद्रांवर सेवा उपलब्ध असेल, जेथे एचआयव्ही रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे.

मुंबई आधीपासून अशा चार मशिन्स बसवलेल्या आहेत. पण तपासणीनंतर रुग्णांना रिपोर्ट प्राप्त करण्यासाठी दोन महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागत होती. पण आता १६ मार्च या सुविधेचं उद्घाटन करण्यात आले. या सीडी 4 तपासणीची सुविधा यापूर्वी केईएम, जेजे, सायन आणइ नायर या चार मुख्य चिकित्सा महाविद्यालयात उपलब्ध होत्या. पण आता ही सुविधा वाढवण्यात आली आहे.


जागतिक निधीचा वापर करून राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (एनएसीओ) या मशीन्सची खरेदी केली आहे. शहरात एचआयव्हीचे जवळपास ३६,५०१ रुग्ण आहेत. आणि प्रत्येक एचआयव्ही रुग्णांना प्रत्येक ६ महिन्याला सीडी 4 ची  तपासणी करावी लागते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा