Advertisement

Coronavirus update: मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा

महाराष्ट्रात कोरोनाचे (Coronavirus update) ५ रुग्ण आढळले असले, तरी मुंबईत अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

Coronavirus update: मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाचे (Coronavirus update) ५ रुग्ण आढळले असले, तरी मुंबईत अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी तातडीचे बैठक बोलवली आहे.

हेही वाचा- 'कोरोना'चे 6 प्रवासी मुंबईतील कस्तुरबामध्ये दाखल

कोरोना व्हायरसच्या संसर्गाबद्दल बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) म्हणाले की, दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. हे दाम्पत्य सहलीनिमित्त दुबईला गेले होते. त्यानंतर हे दाम्पत्य ज्या विमानाने दुबईहून मुंबईला उतरले त्या विमानातील सर्व महाराष्ट्रातील प्रवाशांचीही चाचणी करण्यात येणार आहे. अशा ४० प्रवाशांशी संपर्क साधण्यात येत आहे. सोबतच ज्या टॅक्सीचालकाच्या गाडीत ते बसले होते, त्या टॅक्सी चालकाच्या संपर्कात आलेल्या ७ ते ८ जणांचीही चाचणी करण्यात आली आहे. त्याचे वैद्यकीय चाचणी अहवाल अजून यायचे आहेत. ते आल्यावरच महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा (maharashtra coronavirus) आकडा किती वाढेल हे कळू शकेल. या दाम्पत्याला सध्या पुण्यातील महापालिकेच्या नायडू रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.

तसंच २  दिवसांपूर्वी कोरोना संशयितांना (coronavirus suspect) मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात (kasturba hospital) दाखल करण्यात आलं होतं. वैद्यकीय चाचण्यांनंतर यापैकी एकाही रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलेलं नाही,” अशी माहिती देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत कोरोनाचा (coronavirus suspect patient) एकही रुग्ण नसल्याने घाबरून जाण्याचं कारण नाही. कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सर्व जिल्ह्यांतील यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयपीएल तसंच अन्य क्रीडा स्पर्धांबाबत निर्णय घेण्यात येईल, असंही टोपे म्हणाले.  

हेही वाचा- कोरोना व्हायरसचा 'कोरोना बिअर' व्यवसायावर परिणाम

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत १३९ संशयीत रुग्णांना दाखल करण्यातआलं होतं. त्यापैकी १३३ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली असून ६ जणांचे चाचणी अहवाल अजून यायचे आहेत. महाराष्ट्रातील काेरोनाची चिंता वाढल्यानंतर मुंबई आणि नागपूर विमानतळावर १.२९ लाख प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.  या स्क्रिनिंगमध्ये ३०४ प्रवाशांमध्ये ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे आढळून आल्यावर त्यांना राज्यातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा