Advertisement

मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या घटणार, 'हे' आहे कारण

कोणत्याही परिसरात कोरोना रुग्ण आढळला की तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केला जातो. त्यामुळे या ठिकाणी पालिकेची आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. तसंच येथे पोलीस बंदोबस्तही ठेवावा लागतो.

मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या घटणार, 'हे' आहे कारण
SHARES

एक-दोन रुग्ण आढळलेला भाग कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित न करता त्या रुग्णाला तातडीने पालिकेच्या अलगीकरण कक्षात हलवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या घटणार आहे.

कोणत्याही परिसरात कोरोना रुग्ण आढळला की तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केला जातो. त्यामुळे या ठिकाणी पालिकेची आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. तसंच येथे पोलीस बंदोबस्तही ठेवावा लागतो. यासाठी मोठे मनुष्यबळ लागते. तर कंटेनमेंट झोनचीही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी पालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी आयुक्तांनी कंटेनमेंट झोनची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याकडे लक्ष वेधले. ही संख्या कमी करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या एका इमारतीत एक रुग्ण सापडला तरी तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येतो. यापुढे तसे न करता त्या रुग्णाला तातडीने पालिकेच्या अलगीकरण कक्षात हलवले जाणार आहे.  त्यामुळे पालिकेची यंत्रणा कमी प्रमाणात लागून मनुष्यबळाचा वापर कमी होईल. हे मनुष्यबळ जेथे आवश्यकता असेल तेथे वापरण्यात येईल, असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

 कोरोना रुग्णांना चौदा दिवस अलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. हे दिवस कमी करून ते सात दिवसांवर आणण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णाला सात दिवसांपासून दहा दिवसापर्यंत ताप व अन्य लक्षणे आढळून आली नाही तर घरी पाठवण्यात येते. घरी गेल्यावर किमान सात दिवस घराबाहेर न पडण्याचे बंधन घालण्यात आले आहे.


हेही वाचा -

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन? पण केंद्रानंतरच घोषणेची शक्यता

पोलिसांवर हल्ल्याच्या 218 गुन्हे, तर 770 जणांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा