मुंबईत आता कोरोना रुग्णांची संख्या घटत चालल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून दहिसर विभागातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दहिसरमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधीही सर्वात कमी ७२ दिवस आहे. तर कांदिवलीतील रुग्ण दुपटीचा कालावधी ८१ दिवसांचा आहे. दहिसर विभागात आठवड्यात ५०० ते ८०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे.
मुंबईत रोज १२०० ते १५०० नवीन रुग्ण आढळत आहेत. आठवड्यापूर्वी रुग्णसंख्या दोन हजारांपर्यंत होती. परळमध्ये रोज २० ते २५, तर वरळीत १७ आणि प्रभादेवीमध्ये ३४ रुग्ण रोज आढळत आहेत. वरळी, परळ, लालबाग, शिवडी, प्रभादेवी, नायगावमध्ये रुग्णांची संख्या कमी होत चालल्याचं दिसत आहेत. परळमधील रुग्ण दुप्पट कालावधी १९८ तर वरळीत १८० दिवस आहे.
कोविशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात
मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 'इतक्या' दिवसांवर