कल्याण-डोंबिवली मध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतेय. ही बाब लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी घोषणा केली आहे की, गुरुवारपासून अनावश्यक दुकानं आठवड्यातून सहा दिवस सायंकाळी ७ नंतर खुली ठेवण्यास परवानगी नाही. अशी दुकानं शनिवारी किंवा रविवारी एकतर बंद ठेवावी लागतील.
अत्यावश्यक सेवा प्रवर्गाअंतर्गत वर्गीकृत केलेल्या दुकानांना आता ९ वाजता बंद करावी लागतील. तर पूर्वीची अंतिम मुदत ११ वाजेपर्यंत होती. शिवाय, केडीएमसीनं शहरातील भाजीपाला बाजारपेठा गुरुवारपासून ५० टक्के क्षमतेनं चालवण्याचे निर्देशही दिले आहेत.
यापूर्वी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स रात्री ११ वाजेपर्यंत ऑपरेट करु शकतील किंवा अन्न पुरवू शकतील. परंतु या भागातील खाद्य स्टॉल्सच्या गर्दीमुळे केडीएमसीला अशा प्रकारच्या आस्थापनांसाठी ७ वाजेपर्यंतची अंतिम मुदतही दिली गेली.
बुधवारी कल्याण-डोंबिवलीमध्ये COVID 19 चे ३९२ रुग्ण आढळले. आतापर्यंत ६५ हजार ४६२ वर कोरोना रुग्णांचा आकडा गेला आहे. या भागात आतापर्यंत १ हजार २०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन डॉ. सूर्यवंशी यांनी आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या खासगी डॉक्टर आणि पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. आयुक्त म्हणाले की, प्रत्येक विवाहसोहळ्यात किंवा इतर मेळाव्यात ५० लोकांच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस गुन्हे दाखल करतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त करताना राज्यभरातील कोविड -१९ रुग्णांमध्ये झालेल्या वाढीची कबुली दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सांगितलं की, “लॉकडाउन लादणं आम्हाला आवडत नाही, परंतु जर लोक कोविड नियमांचं पालन करीत नाहीत तर आम्हाला यावर निर्णय घ्यावा लागेल.”
“आम्ही लसीकरण कार्यक्रमही सुरू केला आहे. परंतु लोकांना नियमांचं पालन करण्याची गरज आहे, असं ठाकरे पुढे म्हणाले
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी “आम्हाला सावधगिरी बाळगून कोविडसोबत रहायला शिकण्याची गरज आहे.” असं सांगितलं. तसंच २४x७ लसीकरण केंद्रांसह डोर-टू-डोअर किंवा होम लसीकरणांची संकल्पनेचा विचार केला जात आहे.
टोपे यांनी देशातील अन्य बड्या राज्यांद्वारे, विशेषत: उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातनं नोंदविलेल्या प्रकरणातील तक्रारीबद्दल संशय व्यक्त केला. टोपे म्हणाले, "एकतर ते पुरेसे चाचणी करीत नाहीत किंवा डेटा नोंदवण्यामध्ये काहीतरी गडबड आहे."
हेही वाचा