Advertisement

झोपडपट्टीवासीयांना मिळणार घरपोच आरोग्य सुविधा; फिरत्या दवाखान्याचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ

या फिरत्या दवाखान्यांमध्ये रक्त-लघवी तपासणी, उपचारात्मक आरोग्य सेवा, प्राथमिक उपचार, , कुटुंबनियोजन, प्रसूतीपूर्व व प्रसुतीपश्चात माता व बालसंगोपन या सुविधा मिळणार आहेत.

झोपडपट्टीवासीयांना मिळणार घरपोच आरोग्य सुविधा; फिरत्या दवाखान्याचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
SHARES

राज्यातील दुर्गम भागात तसंच शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आता फिरत्या दवाखान्यांमधून आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. त्यानुसार फिरते वैद्यकीय उपचार केंद्र (Mobile Medical Unit) म्हणून ओळख असणारे दहा फिरते वैद्यकीय दवाखाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानंतर आता लायन ताराचंद बापा हॉस्पीटल आणि संशोधन केंद्राच्यावतीनं नुकताच एक फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. बुधवारी राजभवन येथे या फिरत्या दवाखान्याचे उद्धाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात अाले. 


फार्मासिस्ट, डॉक्टर असणार

या फिरत्या दवाखान्यांमध्ये रक्त-लघवी तपासणी, उपचारात्मक आरोग्य सेवा, प्राथमिक उपचार, , कुटुंबनियोजन, प्रसूतीपूर्व व प्रसुतीपश्चात माता व बालसंगोपन या सुविधा मिळणार आहेत. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यामातून धारावी, कोळीवाडा व परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरपोच आरोग्य सुविधा मिळणार आहे. या चालत्या- फिरत्या रुग्णालयामध्ये फार्मासिस्ट, डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट आणि इसीजी तंत्रज्ञ यांचा समावेश असणार आहे. 


राज्यपालांचं अावाहन

राज्यातील सार्वजनिक रुग्णालयाप्रमाणं खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी देखील अशाप्रकारे फिरती रुग्णालये सुरू करावी. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला व दुर्गम भागातील नागरिकांना घरपोच आरोग्य सेवा मिळण्यात मदत मिळेल, असं आवाहन राज्यपालांनी केलं आहे. या उद्घाटनावेळी ताराचंद बापा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. भारत पाठक व लायन्स क्लब ऑफ सायनचे पदाधिकारी उपस्थित होते.



हेही वाचा - 

१२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान पालिकेची टीबी नियंत्रणासाठी विशेष मोहीम




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा