Advertisement

एम. पूर्व. वाॅर्डात क्षयरोगाचं प्रमाण जास्त, 'डाॅक्टर फाॅर यू' संघटनेचं सर्वेक्षण


एम. पूर्व. वाॅर्डात क्षयरोगाचं प्रमाण जास्त, 'डाॅक्टर फाॅर यू' संघटनेचं सर्वेक्षण
SHARES

अस्वच्छता आणि कोंदट वातावरणामुळे सध्या मुंबईत क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय, मुंबईतील काही पुनर्वसनाची ठिकाणंही क्षयरोगासाठी पुरक आहेत. एम वाॅर्ड विभागातील काही पुनर्वसन प्रकल्पात येणाऱ्या इमारतींच्या रचनेमुळे सूर्यप्रकाशाचा अभाव जाणवतो आणि त्यामुळे कोंदट वातावरण निर्माण होत असल्याने क्षयरुग्णांची संख्या वाढली आहे, असा अहवाल 'डॉक्टर फॉर यू' या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे.


एम वॉर्डात क्षयरुग्णांची संख्या वाढती

एम वाॅर्ड विभागातील गोवंडी, शिवडी, मेहूल, मानखूर्द, नटवार पारेख आणि लाल्लूभाई कंपाऊंड इथल्या इमारती कोंदट वातावरणाच्या आहेत. या इमारतींची रचना आरोग्याला पोषक नाहीत. मोकळी हवा नसणे, सूर्य प्रकाशाची कमतरता अशा अनेक कारणांमुळे या भागात क्षयरोगाच्या विषाणूंना पोषक वातावरण मिळतं.


क्षय रुग्णांच्या संख्येत इतकी वाढ

२൦१६ मधील आकडेवारीनुसार चेंबूर येथे ३ हजार ४५२ तर, गोवंडीत ४ हजार ६४२ क्षयरोगाचे रुग्ण आढळले. म्हणजे, चेंबूर येथील प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे ७५८ क्षयरुग्ण आहेत. तर, गोवंडीत एक लाख लोकसंख्येमागे १ हजार ५५ क्षयरुग्ण आहे. हा परिसर एम पूर्व विभागात येत असून सर्वच बाबतीत मागास आहे. त्यामुळे या परिसरात क्षयरुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे पसरतो. हा जीवाणू दमट आणि थंड वातावरणात वाढतो. खोकला शिंकेतून क्षयरोगाच्या जीवणूचा संसर्ग होतो. जागतिक क्षयरोगाच्या टक्केवारीत भारतात हे प्रमाण २५ टक्क्यांवर आहे. स्वच्छतेचा अभाव, मोठे कुटुंब, असकस आहार, रोग प्रतिकारशक्ती कमी असणे हे क्षयरोगाच्या प्रसाराची कारणं आहेत.


हेही वाचा -

टीबी रुग्णांना नकोय शिरा अन् उपमा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा