Advertisement

2027 पर्यंत मुंबईतील 17 स्थानकांवर डेक बांधणार

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP-3A) अंतर्गत हा प्रकल्प राबवत आहे.

2027 पर्यंत मुंबईतील 17  स्थानकांवर डेक बांधणार
SHARES

वाढत्या प्रवाशांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्ये (railway station) मोठे बदल केले जात आहेत. स्थानकाच्या विस्तारासाठी जागा नसल्याने अधिकारी 17 स्थानकांवर प्लॅटफॉर्मच्या वर उंच डेक बांधत आहेत. या डेकमुळे प्लॅटफॉर्मची गर्दी कमी होऊन ती नियंत्रणात राहील.

मुंबई (mumbai) रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP-3A) अंतर्गत हा प्रकल्प राबवला जात आहे. अपग्रेड केलेली स्थानके 70-80 वर्षांहून अधिक जुनी आहेत आणि त्यांचा विस्तार आवश्यक आहे. डेक-लेव्हल जागांच्या आर्थिक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी 2022 मध्ये नाईट फ्रँक इंडियाने एक व्यवहार्यता अभ्यास केला.

सर्व फूट ओव्हरब्रिज (FOB) या डेकशी जोडले जातील, ज्यामुळे प्लॅटफॉर्मच्या वर एक सतत नेटवर्क तयार होईल. या डिझाइनमुळे प्रवाशांची प्लॅटफॉर्म वर होणारी अतिरिक्त गर्दी कमी करता येईल. काही स्थानकांवर स्टॉल आणि इतर सोईसुविधा निर्माण करण्यासाठी अतिरिक्त डेक जागा असेल.

या स्थानकांमध्ये (stations) मोठे बदल होणार:

1. डोंबिवली (dombivli) स्थानकाला 210 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद एलिव्हेटेड डेक मिळेल ज्यामध्ये उत्तर आणि दक्षिण बाजूंना नवीन एफओबी असतील.

2. घाटकोपरचा पूर्वेकडील डेक पूर्ण झाला आहे. तसेच पश्चिमेकडील आणि सीएसएमटीच्या टोकावर डेकचे काम सुरू आहे.

3. भांडुपमध्ये (bhandup) 228 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद डेक असेल ज्यामध्ये उत्तर आणि दक्षिण बाजूंना एफओबी असतील.

4. कसारा येथे 17 मीटर लांबीचा डेक एका मेगा स्कायवॉकला जोडला जाईल.

5. मुलुंडमध्ये 145 मीटर लांब आणि 9.25 मीटर रुंद डेक असेल ज्यामध्ये उत्तर, मध्य आणि दक्षिण टोकांना नवीन एफओबी असतील.

6. पर्यटकांसाठी प्रवेश सुधारण्यासाठी नेरळला तीन डेक, एक एफओबी आणि प्लॅटफॉर्म विस्तार केला जाणार आहे.

7. चेंबूरमध्ये सहा मीटर रुंदीचा एक नवीन मधला पूल आणि एफओबी जोडणारा डेक कनेक्टर असेल.

8. मानखुर्दमध्ये प्लॅटफॉर्म 1 सोबत 235 मीटर लांबीचा आणि 9.6 मीटर रुंदीचा डेक असेल, ज्यामध्ये दोन नवीन एफओबी असतील.

9. गोवंडीमध्ये वॉकवे, लिफ्ट आणि प्लॅटफॉर्म 1 आणि 2 वर एलिव्हेटेड डेक असतील.

10. जीटीबी नगरमध्ये डबल-डिस्चार्ज प्लॅटफॉर्म तयार केला जाईल.

11. कांदिवलीमध्ये 4 मीटर रुंदीचा स्कायवॉक वापरात आहे, ज्यामध्ये 263 मीटर लांबीचा डेक उत्तर आणि दक्षिण बाजूच्या एफओबीला जोडणार आहे.

12. मीरा रोडवर 158.5 मीटर लांबीच्या आणि 10.7 मीटर रुंदीच्या प्लॅटफॉर्मवर उत्तर आणि मध्यभागी नवीन एफओबी असतील.

13. भाईंदरला 259 मीटर लांबीचा आणि 22 मीटर रुंदीचा डेक मिळेल.

14. सांताक्रूझमध्ये 80 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद मधला एफओबी असेल.

15. वसई रोडवर 160 मीटर लांब आणि 11 मीटर रुंद डेक असेल. ज्यामध्ये चर्चगेटच्या टोकाला 6 मीटर रुंद एफओबी असेल.

16. नालासोपारा येथे प्लॅटफॉर्म 1 च्या उत्तर आणि दक्षिण टोकांना उंच डेक असतील.

17. खारमध्ये नवीन डेक, एफओबी, लिफ्ट आणि एस्केलेटरसह संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे.

हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मीरा रोड, खार, कांदिवली, कसारा आणि नेरळ हे 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. उर्वरित 12 स्थानकांवर मार्च 2027 पर्यंत टप्प्याटप्प्याने काम सुरू राहील.



हेही वाचा

ऑनलाईन नोंदणी केल्यावरच मंत्रालयात प्रवेश

महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात 'इतक्या' उमेदवारांना मिळाली नोकरी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा