Advertisement

बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या घरांची पहिली सोडत १५ मार्चला

बीडीडी पुनर्विकास समिती तसंच रहिवाशांच्या (bdd chawl redevelopment committee) शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच भेट घेतली.

बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या घरांची पहिली सोडत १५ मार्चला
SHARES

बीडीडी पुनर्विकास समिती तसंच रहिवाशांच्या (bdd chawl redevelopment committee) शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच भेट घेतली. यावेळी पुनर्विकासातील अडथळे दूर करून वरळीतील ना.म.जोशी, नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास जलदगतीने करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. सोबतच ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील स्थलांतरीत २६० रहिवाशांसाठी म्हाडामार्फत (mhada) १५ मार्चला सोडत काढून घरे देण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केली. 

हेही वाचा- 'या' बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काचं घर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली बीडीडी चाळीसंदर्भात (Bdd chawl redevelopment project) सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक झाली. या बैठकीला बीडीडी पुनर्विकास समिती तसंच रहिवाशांच्या शिष्टमंडळासोबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव अजोय मेहता, माजी मंत्री सचिन अहिर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी बीडीडी पुनर्विकास (Bdd chawl redevelopment project) समितीच्या शिष्टमंडळासाेबत चर्चा करून प्रशासनाला काही सूचना केल्या. बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प हा विशेष प्रकल्प म्हणून हाताळण्यात यावा, बीडीडी चाळीत रहात असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात यावं. त्यासाठी उप-जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह स्वतंत्र यंत्रणा राबवावी. ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील (nm joshi marg bdd chawl) सर्व रहिवाशांचं स्थलांतर झाल्यावर पुनर्विकासाला गती द्यावी. सोबतच नायगाव, शिवडी आणि वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या टप्प्यांची निश्‍चिती करून तिथंही जलदगतीने काम सुरू करावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

हेही वाचा-हिवाशांची एसीबी चौकशी थांबवा, बीडीडी चाळ संघटनांची मागणी

ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील (nm joshi marg bdd chawl) ८०० पैकी २६० रहिवासी पहिल्या टप्प्यात संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले आहेत. तर उर्वरित रहिवाशांनी अद्यापही घरे रिकामी केली नाहीत. त्यामुळे स्थलांतरीत झालेल्या रहिवाशांसाठी सोडत (mhada lottery) काढून त्यांना करारासह नवी घरे द्यावीत. त्यामुळे उर्वरित रहिवाशांमध्येही विश्वास निर्माण होऊन ते पुनर्विकासासाठी घरे रिकामी करतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या उपस्थितीत ही सोडत १५ मार्च रोजी म्हाडातर्फे काढण्यात येईल.

बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी पहिल्यांदाच घरे उपलब्ध होणार असल्याने स्थलांतरीत झालेल्या रहिवाशांमधील उत्सुकता वाढीस लागली आहे. नव्या घरात पाऊल ठेवण्यास रहिवासी सज्ज झाले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा