Advertisement

'समृद्धी' नवा टोलझोल... महामार्गावर तब्बल ३१ टोल

वादग्रस्त समृद्धी महामार्गावर १०-२० नव्हे, तर तब्बल ३१ टोल असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराखाली उघड झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा नागपूर प्रवास सुपरफास्ट होणार असला तरी त्यासाठी खिशाला मोठी कात्री लागणार आहे. हे मात्र खरं.

'समृद्धी' नवा टोलझोल... महामार्गावर तब्बल ३१ टोल
SHARES

वादग्रस्त समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचा आरोप शेतकऱ्यांसह माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत आहे. असं असताना हा प्रकल्प आता आणखी एका वादात अडकणार आहे. कारण या महामार्गावर १०-२० नव्हे, तर तब्बल ३१ टोल असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराखाली उघड झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा नागपूर प्रवास सुपरफास्ट होणार असला तरी त्यासाठी खिशाला मोठी कात्री लागणार आहे. हे मात्र खरं.


जमीन संपादन वाद कायम

मुंबई-नागपूर हे ८०० किमीचं अंतर कापण्यासाठी सद्यस्थितीत १६ ते १७ तास लागतात. प्रवासाचा हा वेळ वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएमआरसी)ने ७१० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार सुमारे २० हजार ८२० हेक्टर जमीन संपादित करत हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मात्र आपल्या जमिनी देण्यास विरोध करत न्यायालयात धाव घेतल्याने जमीन संपादनाचा वाद चिघळलेला आहे.



खिलाशा कात्री अन् धिमा प्रवास

त्यातच या महामार्गावर भरमसाठ टोल आकारण्यात येईल, अशी शक्यता टोल अभ्यासक आणि शेतकरी सुरूवातीपासूनच व्यक्त करत होते. परंतु टोलबाबत खात्रीलायक माहिती समोर येत नव्हती. असं असताना टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी माहिती अधिकाराखाली समृद्धीतील टोलझोल समोर आणला आहे.

त्यांनी मिळवलेल्या माहितीनुसार मुंबई ते नागपूर या ७१० किमीच्या संपूर्ण अंतरात एकूण ३१ टोल असणार आहेत. त्यामुळे समृद्धी मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना १५०० ते २००० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. एका बाजूला हा महामार्ग 'सुपरफास्ट' असेल, असा दावा होत असताना ३१ टोलमुळे प्रवास धिम्या गतीने होणार हेही नक्की.


पर्यावरण मंजुरीही नाही

या प्रकल्पाला अद्याप पर्यावरणासंबंधीची परवानगी मिळालेली नाही, प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल अजून सादर झालेला नाही. इतकंच काय तर मास्टर प्लानचाही पत्ता नाही. असं असताना कुठे आणि किती टोल असणार याची मात्र 'एमएसआरडीसी'ने व्यवस्थित तरतूद करून ठेवली आहे. या तरतुदीतून येऊ घातलेला एक नाव टोलझोल समोर आला आहे. यावर आता सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं.
- संजय शिरोडकर, टोल अभ्यासक


'असे' असतील टोलनाके

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर येण्या-जाण्यासाठी ५ इन्टरचेंज अर्थात एण्ट्री-एक्झिट पाॅईंट आहेत. या पाचही एण्ट्री-एक्झिट पाॅईंटवर ३१ टोलनाके असणार आहेत. इन्टरचेंज-१ वर ६, इन्टरचेंज-२ वर ७, इन्टरचेंज-३ वर ८, इन्टरचेंज-४ वर २ आणि इन्टरचेंज-५ वर ८ असे हे एकूण ३१ टोल असणार आहेत.



हेही वाचा-

समृद्धी महामार्गाच्या शुभारंभाचा मुहूर्त टळणार?

मोपलवारांकडून मागितली १० कोटींची लाच, मांगले दाम्पत्याला अटक



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा