मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरातील मध्ययुगीन आणि ब्रिटीश काळातील सहा किल्ले लवकरच पर्यटन स्थळे म्हणून विकसित केली जाणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांची ठिकाणे आणि राज्य सरकारकडून नाणी संग्रहालय देखील या किल्ल्यांमध्ये विकसित केली जाणार आहेत.
यामुळे किल्ल्याच्या संवर्धनासाठी संसाधनं निर्माण होतील. सोबतच साइट्सचा सांस्कृतिक स्थळे म्हणून विकास होईल. त्यामुळे याबाबतचा अंतिम प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवला जाणार आहे. वांद्रे, वरळी, शिवडी, माहीम, धारावी आणि सेंट जॉर्ज या सहा किल्ल्यांचा यात समावेश आहे.
अहवालानुसार, किल्ल्यांवर मुंबईच्या इतिहासाची माहिती देणारा ध्वनी आणि प्रकाश शो देखील ठेवण्यात येईल. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मोबाइल अॅपचा वापर करून तो पर्यटकांना पाहता येण्याची सोय देखील केली जाऊ शकते.
शिवाय या किल्ल्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात आली आहे.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा प्रकल्प पर्यटन आणि संस्कृती विभागाकडून चालवला जात शल्याचं जाहीर केलं.
मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील समित्या पुरातत्व संवर्धनाव्यतिरिक्त इतर कामांवर देखरेख ठेवतील, असं बैठकीत सांगण्यात आलं.
हेही वाचा