Advertisement

वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड, नरिमन पॉइंटला मीरा-भाईंदरशी जोडण्याचा मार्ग मोकळा

वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम 2023-24 पासून सुरू होणार आहे.

वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड, नरिमन पॉइंटला मीरा-भाईंदरशी जोडण्याचा मार्ग मोकळा
SHARES

कल्याण, भिवंडीसह मुंबईला मीरा-भाईंदर, वसई-विरार, नवी मुंबई आणि ठाणे यांना जोडण्यासाठी BMC अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. यामध्ये कोस्टल रोड सर्वात प्रमुख आहे.

कोस्टल रोड वर्सोवा ते दहिसरपर्यंत वाढवण्याची घोषणा पालिकेने केली आहे. यासाठी 9000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पालिका आयुक्त आयएस चहल यांनी सांगितले की, या प्रकल्पाची निविदा तयार आहे, जी मार्च-एप्रिलपर्यंत जारी केली जाईल.

वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम 2023-24 पासून सुरू होणार आहे. रस्त्याने हे अंतर सुमारे 22 किमी आहे, जे पार करण्यासाठी सुमारे एक तास लागतो. कोस्टल रोडच्या बांधकामामुळे हे अंतर काही मिनिटांत कापता येणार आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या सुमारे सहा किमी लांबीच्या रस्त्याची निविदा गेल्या वर्षी काढण्यात आली होती.

दहिसर ते भाईंदर दरम्यान एलिव्हेटेड रोड बांधण्याची योजना पालिकेने आखली आहे. यामध्ये १.५ किमी लांबीचा रस्ता पालिका क्षेत्रात येणार आहे, तर ३.५ किमी लांबीचा रस्ता मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात येणार आहे.

भविष्यात हा उन्नत रस्ता कोस्टल रोडच्या शेवटच्या टोकाला (कांदिवली) जोडला जाईल, त्यानंतर दक्षिण मुंबई ते भाईंदरपर्यंत लोकांना सहज प्रवास करता येईल. त्याच्या बांधकामामुळे वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत होईलच, त्याचबरोबर लोकांना वाहतुकीपासूनही दिलासा मिळणार आहे.

कोस्टल रोडसाठी 3545 कोटी

पालिकेच्या 2023-24 या वर्षाच्या बजेटमध्ये कोस्टल रोड प्रकल्पालाही प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्पात 3545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोस्टल रोडच्या कामासाठी सध्या पाच हजार कोटींहून अधिक निधीची आवश्यकता आहे.

उर्वरित 1500 कोटी रुपये कुठून येणार, हे बजेटमध्ये सांगण्यात आलेले नाही. चहल म्हणाले की, नोव्हेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. सुमारे 10 किलोमीटर लांबीचा हा रस्ता वरळीच्या शेवटी असलेल्या वांद्रे-वरळी सी लिंक रोडला प्रिन्सेस स्ट्रीटपासून जोडेल.

गतवर्षी कोस्टल रोडसाठी 2650 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. यावर्षी कोस्टल रोडला सुमारे 900 कोटी रुपये अधिक देण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 12,700 कोटी रुपये खर्च केले जातील.

कोस्टल रोडचे आतापर्यंत ६९ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती चहल यांनी दिली. कोस्टल रोडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचे काम सुरू आहे. चौथ्या टप्प्यांतर्गत गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत बांधण्यात येत असलेल्या दुसऱ्या बोगद्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

1856 वाहने पार्किंगची व्यवस्था

कोस्टल रोड सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही, व्हिडीओ मॅनेजिंग सिस्टीम, आपत्कालीन दळणवळण सुविधा, पोलीस आणि अग्निशमन दलाशी त्वरित संपर्काची व्यवस्था करण्यात येणार आहे.

कोस्टल रोडवरचा प्रवास सुरक्षित आणि सोपा होण्यासाठी २४ तास नियंत्रण करणारी यंत्रणा तयार केली जाईल. कोस्टल रोडलगत सुमारे 75 लाख चौरस फूट जागेत गार्डन, जॉगिंग ट्रॅक, ओपन थिएटर, 3 भूमिगत पार्किंग आणि शौचालये आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

BMC कोस्टल रोडजवळ 3 भूमिगत पार्किंग करणार आहे. एकूण 1856 वाहने पार्किंगची व्यवस्था असेल. त्याच्या छतावर उद्यान आणि क्रीडांगण तयार करण्यात येणार आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा